Bopdev Ghat : बोपदेव घाटातील अंधार कधी संपणार? सुरक्षा रामभरोसे; पोलिसांच्या गस्तीतच समोर आला गैरप्रकार

Pune Crime News : काहीच महन्यापूर्वी येथील बोपदेव घाट परिसरात एक दुर्दैवी घटना घडली होती. ज्यात त्या तरूणीवर अत्याचार करण्यात आला होता. त्यानंतर पोलिस यंत्रणा अलर्टमोडवर आली होती.
Bopdev Ghat
Bopdev Ghatsarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्याहून सासवडला जाणाऱ्या रस्त्यावरील बोपदेव घाट परिसरात काहीच महिन्यापूर्वी एका महाविद्यालयीन तरूणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणानंतर राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते. तर त्यानंतर बोपदेव घाट परिसरासह पुण्यातील इतर टेकड्यांवरील सुरक्षाविषयक उपाययोजना चर्चेत आल्या होत्या. तर त्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने 80 कोटींचा निधी दिला होता. पण आता हा निधा गेला कुठे असा सवाल उपस्थित केला जातोय. कारण येथे इतकी मोठी आणि दुर्दैवी घटना झाल्यानंतरही पथदिवे आणि सीसीटीव्हीची सोय करण्यात आलेली नाही. यामुळे येथे पथदिवे आणि सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केली जातेय.

पुण्याहून सासवडला जाणाऱ्या रस्त्यावरील बोपदेव घाट परिसर हा पुण्यासह आजू बाजूच्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. पण रात्रीच्या वेळी हा घाट निर्जन आणि धोकादायक बनल्याचे याआधी देखील समोर आले आहे. येथे घटलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतरही मध्यरात्री तरुण-तरुणींचा मुक्त वावर होत असल्याचे धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. तर ही बाबत पोलिसांनी रात्रीच्या वेळी केलेल्या गस्तवेळी समोर आली आहे.

पोलिसांच्या विशेष पथकाने मध्यरात्री बोपदेव घाटात गस्त घातली होती. यावेळी घाटात संशयास्पदरीत्या दुचाकी गाड्या पार्क होत्या. तर या गाड्यांची तपासणी केली असता. तेथे काही तरूण आणि तरूणी अडोशाला बसलेले आढळले. तसेच दोन तरूणांसह एक तरूणीही आढळून आली. यावेळी एका वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्याने त्यांची झाडाझडती घेत कानउडणी केलीच शिवाय परराज्यातील त्यांच्या पालकांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठी घडणारी घडना टळल्याची सध्या चर्चा सुरू आहे.

Bopdev Ghat
Pune Crime News : मोठी बातमी! स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीची ओळख पटली

पुन्हा गर्दी वाढतेय

बोपदेव घाटात संध्याकाळनंतर मध्यरात्रीपर्यंतही काही वेळी पर्यटक फिरताना दिसतात. हा परिसर रात्रीच्या वेळी पूर्ण निर्जन असतो. तर मद्यप्राशन करणाऱ्यांची गर्दीही अधीक वाढली आहे. यामुळे अनेक वेळा रहिवाशांनी आणि प्रवाशांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. तसेच येथे पथदिवे आणि सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केली आहे.

दरम्यान सध्याच्या या परिस्थितीवरून पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी पोलिसांनी बोपदेव घाटात गस्त वाढवल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी येथे गस्त वाढवण्यासह चेक पोस्ट लावले असून नागरिकांनी रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे. तसेच पोलिसांनी संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असेही अवाहन पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी केले आहे.

Bopdev Ghat
Pune Crime News : खरंच धाक उरलाय ? पोलिस आयुक्तांचा इशारा, दोनच दिवसांत जेलमधून बाहेर आलेल्या गुंडाने काढली रॅली

तसेच सामाजिक कार्यकर्त्या स्नेहल दगडे यांनी देखील यावरून पोलिसांनी गस्तचे प्रमाण वाढवण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी जगदंबा भवनलगतच्या घाट परिसरात पथदिवे आणि सीसीटीव्ही बसवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी निधी उपलब्ध करून द्यावा, असेही म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com