मोदींच्या कार्यक्रमात फडणवीसांचं भाषण पण अजितदादा बोललेच नाहीत!

पंतप्रधान मोदींच्या हस्ते देहूत शिळा मंदिराचे लोकार्पण...
PM Narendra Modi Latest Marathi News, Ajit Pawar Latest news, devendra Fadnavis Latest News
PM Narendra Modi Latest Marathi News, Ajit Pawar Latest news, devendra Fadnavis Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी देहूमध्ये संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. त्यांनी पंतप्रधान मोदींचं तोंडभरून कौतुकही केलं. पण याच कार्यक्रमात मोदींशेजारी बसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं नाही. त्यावरून आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. (PM Narendra Modi Latest News)

पंतप्रधान मोदी हे तीन महिन्यांत दुसऱ्यांदा पुण्यात आले. सहा मार्च रोजी त्यांच्या हस्ते पुण्यातील मेर्टोचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी देहूमध्ये ते संत तुकारामांच्या चरणी नतमस्तक झाले. या कार्यक्रमाला व्यासपीठावर अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते.

PM Narendra Modi Latest Marathi News, Ajit Pawar Latest news, devendra Fadnavis Latest News
मस्तक माझे पायावरी, या वारकरी संतांच्या! पंतप्रधान मोदी तुकोबांच्या चरणी नतमस्तक

कार्यक्रमात सुरूवातीला देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. त्यांच्या भाषणानंतर अजित पवारांचे भाषण होईल, असे वाटत होते. ते राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमाला आले होते. त्यामुळे त्यांचे भाषण अपेक्षितच होते. पण फडणवीसांचे भाषण झाल्यानंतर निवेदकाने थेट पंतप्रधान मोदींचे नाव घेतले. यावेळी मोदींनीही निवेदकाकडे पाहत अजितदादांच्या दिशेने हात केल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.

अजित पवारांनी कार्यक्रमात भाषण न केल्याने आता राजकीय तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या सहा मार्च रोजीच्या पुण्यातील कार्यक्रमात अजित पवारांनी थेट राज्यपालांवर निशाणा साधला होता. त्याची परीक्षा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती.

PM Narendra Modi Latest Marathi News, Ajit Pawar Latest news, devendra Fadnavis Latest News
पंतप्रधान मोदींसाठी पुण्यात तयार झाली विशेष तुकाराम पगडी आणि उपरणी !

पंतप्रधान मोदी नतमस्तक

मस्तक माझे पायांवरी, या वारकरी संतांच्या, या ओळींनी भाषणाची सुरूवात करत मोदींनी शिळा मंदिर केवळ भक्तीच्या शक्तीचे केंद्र नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्यालाही सशक्त करणारे केंद्र असल्याच्या भावना व्यक्त केल्या. (PM Narendra Modi Latest Marathi News)

देहू संतशिरोमणी संत तुकारामांचे जन्मस्थान आणि कर्मभूमीही असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले, भगवान विठ्ठल आणि सर्व वारकरी, संतांच्या चरणी कोटी कोटी वंदन. शास्त्रामध्ये म्हटलं आहे की, मनुष्य जन्मात सर्वात दुर्लभ संताचा सत्संग आहे. संताची अनुभुती झाली की देवाची अनुभूती आपोआप होते. आज देहूतील या पवित्र भूमीत येण्याचे सौभाग्य मला मिळाले. आज मला तीच अनुभूती येत आहे. (PM Narendra Modi in Dehu)

PM Narendra Modi Latest Marathi News, Ajit Pawar Latest news, devendra Fadnavis Latest News
पंतप्रधान मोदींसाठी पुण्यात तयार झाली विशेष तुकाराम पगडी आणि उपरणी !

धन्य देहू गाव पुण्य भूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग, धन्य क्षेत्रवासी लोक दैवाचे, उच्चारिती वाचे नाम घोष, या ओळींमधून मोदींनी देहूनची महती सांगितली. काही महिन्यांपूर्वीच मला पालखी मार्गात दोन राष्ट्रीय राजमार्गाचे चारपदीकरणच्या भूमीपुजन करण्याची संधी मिळाली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे पाच टप्प्यात तर संत तुकाराम पालखी मार्गाचे तीन टप्प्यात काम होणार आहे. सर्व टप्पयात 350 किलोमीटर लांबीचे महामार्ग बनतील. त्यावर 11 हजार कोटींहून अधिक खर्च केला जाईल. यातून विकासालाही गती मिळेल, असे मोदी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com