No-Confidence Motion News : अविश्वास ठरावापूर्वी भाजपच्या सरपंचांचा राजीनामा; शेणोलीत नाट्यमय घडामोडी

BJP Sarpanch News : अतुल भोसले यांच्याबरोबर झालेल्या सर्व सदस्यांच्या समन्वय बैठकीत राजीनामा देण्याची विनंती कणसे यांना करण्यात आली होती.
BJP sarpanch
BJP sarpanch Sarkarnama

विशाल वामनराव पाटील

Karad News : भाजपची एकहाती सत्ता असलेल्या कराड तालुक्यातील शेणोली ग्रामपंचायतीमध्ये गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यमय घडामोडींना आज अखेर पूर्णविराम मिळाला. ग्रामपंचायत निवडणुकीत 13 पैकी 12 जागा जिंकत एकहाती भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलने सत्ता मिळवली होती. सरपंचपदी भाजपचेच जयवंत बजरंग कणसे यांची निवड करण्यात आली होती. कणसे हे ठरलेला कालावधी पूर्ण होऊनही सरपंचपदाचा राजीनामा देत नसल्याने सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. मात्र, आज अविश्वास ठरावासाठी मतदान होण्यापूर्वीच सरपंचांनी राजीनामा दिला. (BJP sarpanch resigns before no-confidence motion)

कराड तालुक्यातील शेणोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच जयवंत बजरंग कणसे यांच्यावर सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याचा ठपका ठेवत त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. ग्रामपंचायतीच्या दहा सदस्यांनी एकत्र येत कराडचे तहसीलदार विजय पवार यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

BJP sarpanch
Mohite Patil Sugar Factory : मोहिते पाटील कारखान्याची बारामतीच्या कंपनीने केली फसवणूक

गेल्या आठवड्यात बुधवारी उपसरपंच संगीता माळी यांच्यासह नऊ सदस्यांनी हा ठराव दाखल केला. ग्रामपंचायतीवर भाजपचे डॉ. अतुल भोसले यांच्या गटाची एकहाती सत्ता आहे. सर्व सदस्यांमध्ये समन्वय ठेवण्याचा भोसले यांनी याआधी अनेकदा प्रयत्न केला. मात्र, कणसे हे नेत्यांच्या विनंतीचा मान राखत नसल्याने सदस्यांनी एकत्रित येत अविश्वास ठराव दाखल केला.

BJP sarpanch
Bhujbal Vs Vikhe :भुजबळांबाबत विखे पाटलांचे मोठे विधान; ‘त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, नाहीतर मुख्यमंत्र्यांनी...’

सरपंच जयवंत कणसे यांची ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदी निवड झाल्यानंतर त्यांना नऊ महिन्यांचा कालावधी देण्याचे ठरले होते. कालावधी पूर्ण झाल्यानंतर अतुल भोसले यांच्याबरोबर झालेल्या सर्व सदस्यांच्या समन्वय बैठकीत राजीनामा देण्याची विनंती कणसे यांना करण्यात आली होती. त्यावर कणसे यांनी चालढकल करत सुमारे पावणे तीन वर्षे पद सोडले नाही.

सरपंच कणसे हे सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात, असाही आरोप अविश्वास ठराव दाखल करताना सदस्यांनी केला होता. मासिक सभा व ग्रामसभेत ठरलेल्या ठरावाप्रमाणे काम करत नाहीत, यासह अनेक तक्रारी घेऊन बुधवारी सर्व सदस्यांनी तहसीलदार विजय पवार यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता.

BJP sarpanch
Shiv Sena Election Strategy : निवडणूक लोकसभेची; स्ट्रॅटेजी विधानसभेची, ठाकरेंचे सोलापूरसाठी मोठे डावपेच

या ठराव अर्जावर आज मंगळवारी (ता. 28 नोव्हेंबर) सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात अविश्वास ठराव मंजुरीबाबत सभा होणार होती. परंतु, त्यापूर्वीच सरपंच जयवंत कणसे यांनी कराडचे गटविकास अधिकारी विभुते यांच्याकडे राजीनामा मंजुरीसाठी दिला आहे. या अर्जावर साक्षीदार म्हणून विजयकुमार कुंभार आणि मंगल कणसे यांनी स्वाक्षरी केली आहे. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य धोंडिराम जाधव उपस्थित होते.

BJP sarpanch
Kolhapur Politics : बंटी-मुश्रीफांची राज्यात कुस्ती अन्‌ कोल्हापुरात दोस्ती...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com