Pune News : माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचा कार्यक्रम नुकताच आयोजित केला होता. या पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत अटलजींचे राम मंदिराचे स्वप्न मोदीची पूर्ण करत असल्याचे सांगितले होते. या कार्यक्रमात फडणवीस यांनी केलेल्या राजकीय वक्तव्यावर काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी टीका केली आहे.
अटलजींनी विरोधकांचा कायम सन्मान केला. त्यांच्यावर कधीच कमरेखाली वार केले नाहीत. सत्तेची आयुधे वापरून असंवैधानिक मार्गाने भ्रष्टाचाराशी, सत्तेसाठी तडजोड केली नाही. मात्र, अटलजींच्या सद्गुणांचा मोदी-शाहांच्या राजकारणाचा वारसा चालवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना ( Devendra Fadnavis) सोयीस्कर विसर पडला, असा आरोप गोपाळ तिवारी यांनी केला आहे.
अटलजींच्या चांगल्या, संस्मरणीय अराजकीय गुण वैशिष्ठ्यांवर, अजात शत्रूत्वावर, त्यांचे लेखी असलेल्या विरोधकांच्या अस्तित्वावर, त्यांच्या ऐतिहासिक संसदीय भाषणांवर, त्यांच्या संविधानिक, लोकशाही प्रणित राजधर्मप्रेरित गुण वैशिष्ठ्यांवर फडणवीसांनी बोलणे अपेक्षित होते. पण, एका चांगल्या, दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाच्या व्यासपीठावर देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजकीय गरळ ओकण्याचेच काम केले, असा हल्ला तिवारी यांनी देवेंद्र फडणवीसांवर केला. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात विरोधकांना राजकीय आव्हाने देत सांस्कृतिक कार्यक्रमाचा राजकीय आखाडा फडणवीस यांनी केला, अशी टीका तिवारी यांनी केली.
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या गाडीवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावरून देखील तिवारी यांनी भाजपला घेरले. 370 कलमाचा डंका वाजवताना आजही पूँछ भागात भारतीय सैनिक सतत दहशतवादी हल्ल्यात शहीद होत असल्याचे एका राज्याच्या गृहमंत्र्याच्या निदर्शनास येत नाही काय? तसेच 370 कलम हटवून सात वर्षे झाली. राष्ट्रपती राजवटीची एक हाती सत्ता असून देखील तेथे सुरक्षितता ठेवता येत नसेल, निवडणुका घेता येत नसतील तर मग निर्लज्जपणे 370 चा डंका कशाच्या आधारे पिटता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
(Edited By Roshan Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.