

Eight arrested in poisonous liquor case: विषारी दारुमुळे तब्बल 14 जणांचा मृ्त्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फुगेवाडीमध्ये आठ जणांचा दोन दिवसात मृत्यू झाल्याने खळबळ निर्माण झाली होती. त्यानंतर पुण्यातील हडपसर परिसरात देखील पाच जणांचा मृ्त्यू झाल्याची माहिती समोर आली. आता एकुण मृतांची संख्या 14 झाली आहे.
विषारी दारुमुळे हे मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, या प्रकरणी माझे पुण्याच्या आयुक्तांशी बोलणे झाले आहे. आत्तापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून आणखी काही जणांना अटक करण्यात येणार आहे.
पोलिसांनी विषारी दारु कोठे बनली याचा शोध घेतला आहे. ही संपूर्ण साखळी शोधून काढली जाईल आणि त्यांच्या कठोर कारवाई केली जाईल. ही एक प्रकारे हत्याच आहे, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.
विषारी दारु प्रकरणात कर्नलसिंग विरखा हा मुख्य आरोपी असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासोबत योगेश वानखेडे याला देखील अटक करण्यात आली आहे. ऐकुण आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
फुगेवाडी परिसरात झालेल्या आठ मृत्यू प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, विषारी दारु पिऊन मृत्यू झालाचा जबाब आपल्यासमोर आलेला नाही. वेगवेगळ्या घटना आहेत आणि यामध्ये नेतेवाईकांकडून वेगवेगळी कारणं आली आहेत. पोलिसांनी अधिकृतरित्य विषारी दारुमुळे मृत्यू झाल्याचे सांगितलेले नाही. त्यामुळे नातेवाईकांमध्ये संभ्रम कायम आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.