Toxic Liquor Case : फुगेवाडीत एकाच दिवशी आठ जणांचा मृत्यू, बळींची संख्या 13 वर; अखेर गुढ उकलले? एकाला अटक!

Fugewadi toxic liquor case latest update: पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात एकाच दिवसात आठ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. वेगवेगळ्या कारणाने हे मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आता पोलिसांनी एक संशयिताला ताब्यात घेतले आहे.
Yogesh Wankhede arrested
Yogesh Wankhede arrestedsarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad hooch tragedy news: पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी आणि दापोडी भागात एकाच दिवशी तब्बल आठ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. हे मृत्यू नेमके कशामुळे झाले याचे तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार विषारी दारुमुळे या आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, पोलिसांकडून हे संशायस्पद मृत्यू असल्याचे म्हटले आहे.

या आठ जणांच्या मृ्त्यूनंतर पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात तब्बल पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे विषारी दारुची बळींची संख्या 13 वर गेली आहे. पुण्यातील काळे पडळ भागातील तीन आणि हडपसर भागात दोघांचा मृत्यू विषारी दारुमुळे झाला आहे.

गावठी दारु तयार करून त्याची पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात विक्री करणाऱ्या योगेश वानखेडे या संशयिताला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. तो कोंढवा येथील रहिवाशी असून उरळी कांचन येथे गावठी दारु तयार करून शहराच्या विविध भागात विक्री करत होत. त्याने विक्री केलेल्या दारुमुळे हे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याने विक्री केलेले दारुचे कॅन देखील जप्त करण्यात आले आहेत.

Yogesh Wankhede arrested
Tukaram Mundhe News: पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढेंचा दणका! 3 दिवसांत 53 छापे, 25 FIR, 33 जण तुरुंगात

मृत्यूबाबत शंका?

फुगेवाडी परिसरात झालेल्या आठ मृत्यू प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, विषारी दारु पिऊन मृत्यू झालाचा जबाब आपल्यासमोर आलेला नाही. वेगवेगळ्या घटना आहेत आणि यामध्ये नेतेवाईकांकडून वेगवेगळी कारणं आली आहेत. नातेवाईकांचे प्राथमिक जबाब नोंदवले आहेत. आम्ही या प्रकरणी सखोल चौकशी करत आहोत.

Yogesh Wankhede arrested
Dhule Crime : शनी अमावस्येच्या पूजेला गेलेल्या मित्र-मैत्रिणीचा भोंदूबाबाच्या मठात भयानक अंत, धुळ्यातील घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com