Devendra Fadnavis : CM फडणवीसांकडून पुण्यातील नगरसेवकांची शाळा; लोकप्रतिनिधींचही मुख्यमंत्र्यांसमोर गाऱ्हाणं! बैठकीतील Inside Story

Pune BJP Corporators News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील भाजप नगरसेवकांच्या बैठकीत कामाचा आढावा घेतला. पदासाठी रिपोर्ट कार्ड तपासण्याचा इशारा देतानाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मतदान वाढविण्याचे निर्देश दिल्याचे समजते.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune Political News : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (14 ऑक्टोबर) पुण्यात भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत फडणवीस यांनी नगरसेवकांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे निर्देश देतानाच त्यांच्या कामाचा हिशोबही स्पष्ट शब्दांत मागितला.

"उद्या माझ्याकडे पद मागायला आलात, तर सर्वात आधी तुमचं रिपोर्ट कार्ड काढेन. तुम्ही किती आणि कसं काम केलं, याचा आढावा घेईन आणि त्यानंतरच पुढचा विचार करेन", अशा शब्दांत त्यांनी नगरसेवकांना ठणकावल्याचे समजते. दुसरीकडे, पुणे महापालिकेतील एककल्ली कारभाराबाबत काही नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांसमोरच नाराजी व्यक्त केल्याने बैठकीत पक्षांतर्गत अस्वस्थतेचाही मुद्दा पुढे आला.

विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्री, आमदार, खासदार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी पुण्यातील नगरसेवकांची बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. मात्र, ही बैठक केवळ निवडणुकीपुरती मर्यादित न राहता नगरसेवकांच्या कामाचा लेखाजोखा आणि महापालिकेतील कारभारावर चर्चा करणारी ठरल्याचे सांगण्यात येते.

Devendra Fadnavis
Kailas Gorantyal : दुष्काळात नोटांचा पाऊस! "भक्तीत इतका तल्लीन होतो की काय झालं कळलंच नाही"; नोटा उधळल्याप्रकरणी कैलास गोरंट्याल यांचं स्पष्टीकरण

‘कोकणात ८० टक्के मतदान, पुण्यात का नाही?’

पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणी आणि मतदानाचा टक्का वाढविण्यावर मुख्यमंत्र्यांनी विशेष भर दिला. ‘कोकण विभागात ८० टक्के मतदान होते, मग पुणे शहरात का होऊ शकत नाही?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केल्याचे समजते. केवळ मतदार नोंदणी करून थांबू नका, तर नोंदणी केलेल्या मतदारांना प्रत्यक्ष मतदानासाठी प्रवृत्त करा, असा संदेशही त्यांनी दिला.

यावेळी जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी नगरसेवकांनी सक्रिय व्हावे, प्रत्येकाने आपल्या भागात विशेष प्रयत्न करावेत आणि निवडणुकीच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मतदार नोंदणीबरोबरच प्रत्यक्ष मतदान वाढविण्याचे आव्हान भाजपच्या नगरसेवकांसमोर असणार आहे.

पदासाठी कामाचा हिशेब द्यावा लागणार

नगरसेवकांच्या कामकाजाबाबतही फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडल्याचे समजते. पक्षातील पदे किंवा भविष्यातील जबाबदाऱ्या मागताना केवळ राजकीय अपेक्षा व्यक्त करून चालणार नाही, तर त्यासाठी केलेल्या कामाचा हिशेब द्यावा लागेल, असा संदेश त्यांनी दिला. ‘तुम्ही किती आणि कसं काम केलं, याचा आढावा घेतल्यानंतरच पुढचा विचार करेन,’ या भूमिकेतून त्यांनी नगरसेवकांच्या कामाचे मूल्यमापन महत्त्वाचे ठरणार असल्याचे स्पष्ट केले.

नगरसेवकांचीही मुख्यमंत्र्यांसमोर तक्रार

एकीकडे फडणवीस यांनी नगरसेवकांना कामाचा हिशेब मागितला, तर दुसरीकडे काही नगरसेवकांनी पुणे महापालिकेतील कारभाराबाबत आपली नाराजी व्यक्त केल्याचे समजते. महापालिकेतील निर्णयप्रक्रिया एककल्ली पद्धतीने सुरू असल्याची भावना मांडत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबाबतची नाराजी व्यक्त केली . नगरसेवकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतले जात नसल्याच्या तक्रारीही या नाराजीच्या केंद्रस्थानी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Devendra Fadnavis
Gokul Election 2026: गोकुळच्या निवडणुकीवर जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुखांचा वॉच; मतदान, मतमोजणी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

त्यामुळे या बैठकीत केवळ विधानपरिषद निवडणुकीची रणनीती ठरली नाही, तर महापालिकेतील सत्ताकारण आणि पक्षांतर्गत समन्वयाचे मुद्देही चर्चेत आले. नगरसेवकांनी निवडणुकीत सक्रिय राहावे, मतदारांपर्यंत पोहोचावे आणि पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात, अशी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा आहे. आता या बैठकीनंतर नगरसेवक प्रत्यक्ष कामाला किती गती देतात आणि मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कोणती पावले उचलतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com