Kailas Gorantyal : दुष्काळात नोटांचा पाऊस! "भक्तीत इतका तल्लीन होतो की काय झालं कळलंच नाही"; नोटा उधळल्याप्रकरणी कैलास गोरंट्याल यांचं स्पष्टीकरण

Marathwada Drought News: जालना येथे भजन कार्यक्रमादरम्यान माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर समर्थकांनी नोटांची उधळण केली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीका झाली. आपण भक्तीत तल्लीन असल्याने प्रकार लक्षात आला नाही, असे त्यांनी सांगितले.
Kailas Gorantyal
Kailas GorantyalSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalna Politics News : मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता वाढलेली असताना जालन्यातील भाजपचे नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर भजनाच्या कार्यक्रमात नोटांची उधळण करण्यात आल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर गोरंट्याल यांच्यावर टीका होत असून, त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. यापूर्वी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या एका कार्यक्रमातही कार्यकर्त्यांनी नोटांची उधळण केली होती. हा वाद ताजा असतानाच आता जालना शहरातील या प्रकारामुळे पुन्हा एकदा नोटांच्या उधळणीचा मुद्दा चर्चेत आला आहे.

मंगळवारी रात्री जालना शहरातील मंमादेवी मंदिर परिसरात भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी आमदार कैलास गोरंट्याल उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी भजनाच्या तालावर ठेका धरत नृत्य केले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांची उधळण केली होती.

यावर स्पष्टीकरण देताना गोरंट्याल म्हणाले, "मी भक्तीत इतका तल्लीन होतो, की कोण काय करतयं? हे मला कळालंच नाही? भजन कार्यक्रमाच्या आधी आम्ही देवाकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठीच प्रार्थना केली होती. भजनाच्या भक्तीत माणूस इतका मंत्रमुग्ध आणि तल्लीन होऊन जातो की, त्या वेळी कोण काय करतो हे कोणाच्याच लक्षात येत नाही." त्यांच्या या उत्तरानंतरही त्यांच्यावर समाज माध्यमावरून टीका होत आहे.

Kailas Gorantyal
Kailas Patil : 5 हजारात शेतकऱ्यांनी दिवाळी कशी साजरी करावी? ठाकरेंच्या आमदाराचा महायुती सरकारवर थेट हल्लाबोल!

मराठवाड्यात यंदा प्रचंड दुष्काळ आहे. राज्य सरकारने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. यात आता नवीन ४० तालुके सामाविष्ट करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून दिवाळीपूर्वी पाच हजार खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुष्काळाची तीव्रता पाहता मुख्यमंत्र्यांसह राज्यातील सर्वच नेत्यांनी लग्न समारंभ साध्या पद्धतीने करा, असे आवाहन केले आहे. मात्र याच सरकारचे विशेषतः ज्या मराठवाड्यात दुष्काळाची सर्वाधिक तीव्रता आहे त्या भागातील नेतेच असंवेदनशीलपणे वागताना दिसत आहेत.

Kailas Gorantyal
Kalyan Kale : केंद्र अन् राज्यातील सरकार जाऊन राहुल गांधी पंतप्रधान होणार; काँग्रेस खासदार कल्याण काळे यांचा दावा

माजी आमदार तथा भाजपाचे जालन्यातील नेते कैलास गोरंट्याल यांच्यावर एका जाहीर कार्यक्रमातून नोटांची उधळण केल्याचा संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे गोरंट्याल हे स्वतः या क्षणाचा आनंद घेताना दिसत आहेत. मंगळवारी, रात्री जालना शहरातील मंमादेवी मंदिर परिसरात भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

दुष्काळाचे चटके बसणाऱ्या भागात अशा प्रकारे पैशाची उधळपट्टी तीही सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून योग्य आहे का? असा सवाल या प्रकाराचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यावर केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com