Devendra Fadnavis : पुण्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी की भाजपच्या वाट्याला ? मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' उत्तर

Political News : पुणे शहरासाठीचा अजेंडा हा गेल्या अडीच वर्षांमध्ये आम्ही सेट केला आहे. आता फक्त त्या अजेंड्याला गती देणे महत्त्वाचं असून ती गती आम्ही देऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यामध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीने मुख्यमंत्री कोण होणार याबाबतच्या मोठा चर्चा रंगल्या होत्या. त्याच पद्धतीने आता पुण्याचा पालकमंत्री पद हे भाजपकडे राहणार की? ते पुन्हा राष्ट्रवादीला मिळणार या याबाबत दावेप्रति दावे करण्यात येत आहेत. (Devendra Fadnavis News )

जिल्ह्यात भाजपाचे (Bjp) आमदारांची संख्या जास्त असल्याने हे पद भाजपाला मिळणार असा विश्वास भाजपचे स्थानिक नेते व्यक्त करत असताना दुसरीकडे अजित पवारांशिवाय पुण्याचं पालकमंत्री पद कोणाकडे जाऊ शकत नाही, असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते व्यक्त करत आहेत. त्यामुळे पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत संभ्रम असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत भाष्य केले आहे.

Devendra Fadnavis
Narendra Modi : राजीव गांधींनी संविधानाला धक्का दिला; पीएम मोदींनी केला गंभीर आरोप

एका कार्यक्रमानिमित्त पुणे दौऱ्यावरती असताना माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्यात वाचन संस्कृतीला चालना देणारा कार्यक्रम होत आहेत. गेल्या वर्षी देखील या कार्यक्रमाला मी आलो होतो. पुणेकरांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता. सांस्कृतिक राजधानीत अशा प्रकारच्या कार्यक्रमाने माझी कामाची सुरुवात होत आहे. ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Narendra Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संसदेत तुफानी भाषण; केले 'हे' सर्वात मोठे 10 सनसनाटी आरोप

पुणे शहरासाठी आता नव्या सरकारचा अजेंडा काय असणार आहे. याबाबत विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे शहरासाठीचा अजेंडा हा गेल्या अडीच वर्षांमध्ये आम्ही सेट केला आहे. आता फक्त त्या अजेंड्याला गती देणे महत्त्वाचं असून ती गती आम्ही देऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Devendra Fadnavis
Rahul Gandhi : संविधान अन् मनुस्मृतीची प्रत दाखवत राहुल गांधींची भाजपवर टीका; म्हणाले, ' सरकारने युवकांचे अंगठे कापले...'

दादर हनुमान मंदिर प्रकरणाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, 'न्यायालयाने मागच्या काळात निर्णय देऊन मंदिराची वर्गवारी केली आहे. जुनी मंदिर ही त्या वर्गवारीनुसार नियमित करता येतात. याबद्दल रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून निश्चित मार्ग काढू. नियमिती कारणची तरतुद आहे, त्यानुसार नियमितीकरण करून घेऊ. तसेच हिंगोली प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आम्ही यापूर्वीच दिले असल्याचे देखील यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis
Congress State President : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल? हे दोन युवा चेहरा प्रदेशाध्यक्षांच्या रेसमध्ये

राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच पुण्याचे पालकमंत्री पद कोणाकडे राहणार याबाबतच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि आमदारांना पुण्याचे पालकमंत्री पद हे भाजपकडेच राहावे असे वाटत आहे. त्याबाबतची मागणी देखील पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे पुण्याचे पालकमंत्री हे अजित दादाच होतील असा विश्वास अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. या पालकमंत्री पदाबाबत काय निर्णय होणार असे विचारले असता फडणवीस यांनी सर्व माहिती लवकरच मिळेल असे सूचक वक्तव्य केले.

Devendra Fadnavis
Nana Patole : प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देताच नाना पटोले 'या' पदावर दावा करण्याची शक्यता

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com