Loksabha Election 2024 : भाजपकडून माढा मतदारसंघातून रणजीतसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल धैर्यशील मोहित पाटील यांनी बंडाचे निशाणा हाती घेत आपण निवडणूक लढणार, असे म्हणत प्रचाराला सुरुवात केली. धैर्यशील मोहित पाटील शरद गटात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यात आज (गुरुवारी) धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांची पुण्यात भेट घेतली त्यावेळी मोहिते पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं.
शरद पवारांच्या भेटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि मोहित पाटील कुटुंबियांचे जुने ऋणानुबंध आहेत, अशी प्रतिक्रिया धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी दिली. शरद पवारांच्या पक्षात प्रवेश कधी करणार असा प्रश्न मोहिते पाटील यांना विचारले असता त्यांनी 'वेट अँण्ड वाॅच' अशी प्रतिक्रिया दिली. धैर्यशील पाटील यांच्य शरद पवार गटात पक्ष प्रवेश निश्चित मानला जात आहे त्यामुळे पत्रकारांनी तुम्ही पक्षप्रवेशावर बोलण्याचे का टाळताय, काही राजकीय दबाव आहे का? अशी विचारणा केली. त्यावर मोहिते पाटीलांनी पुन्हा 'वेट अँण्ड वाॅच' असेच उत्तर देत पक्षप्रवेशाबाबत थेट बोलण्याचे टाळले.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या शरद पवार गटातील पक्षप्रवेशावर बोलण्याचे टाळले असले तरी खुद्द शरद पवारांनीच धैर्यशील हे दोन दिवसांत पक्षप्रवेश करतील, असे त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले. जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होईल.
रणजीतसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध करत धैर्यशाील यांनी गावभेटी घेत आपल्या प्रचाराला देखील सुरुवात केली होती. मोहिते पाटील यांनी अकलूज मध्ये समर्थकांची बैठक घेत शक्तिप्रदर्शन देखील केले होते. तेव्हापासूनच मोहिते-पाटील हे शरद पवार यांच्यासोबत जातील, अशा चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आज प्रत्यक्षात मोहिते पाटील यांनी पुण्यात येऊन शरद पवार यांची भेट घेतली. तसेच 13 एप्रिल ला धैर्यशील मोहिते पाटील यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत अकलूज येथे जाहीर प्रवेश होणार असून ते तुतारी हातात घेतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे माढ्यात निंबाळकर विरुद्ध मोहित पाटील लढत निश्चित मानली जात आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.