Dhananjay Munde : 'शिवसेनेचा काटा कसा काढायचा? गणेश चतुर्थीला दिल्लीत बैठक...' ; मुंडेंचा मोठा गौप्यस्फोट!

Lok Sabha Election 2024 : दिल्लीला कुणाच्या घरी शिवसेनेला बाजूला कसं काढायचं, याबाबत बैठक झाली होती, याचा व्हिडिओ माझ्याकडे...
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते व राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. 'शिवसेनेला बाजूला कसं करायचं, यासंदर्भात दिल्लीत बैठक झाली होती.' बारामती मतदारसंघातील पुरंदरच्या सभेत मुंडे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. 2017 ला कुठे आणि कशी बैठक झाली हे व्हिडिओसहित सांगू शकतो, असाही त्यांनी मोठा दावा केला आहे. (Latest Marathi News)

धनंजय मुंडे म्हणाले, "2017 ला गणेश चतुर्थीच्या दिवशी शिवसेनेला बाजूला कसं करायचं, याची बैठक झाली होती. ही गोष्ट मी पुराव्यासहित सांगू शकतो. तारखेसहित, व्हिडिओ फुटेजसहित, कुठे आणि कशी बैठक झाली, हे मी सांगू शकतो. दिल्लीला कुणाच्या घरी शिवसेनेला (Shiv Sena) बाजूला कसं काढायचं, याबाबत बैठक झाली होती, सगळं मी पुराव्यासहित सांगू शकतो. मग त्यांनी केलं ते काय होतं संस्कार होतं का? आम्ही काही केलं तर गद्दारी? असा सवाल मुंडेंनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhananjay Munde
Lok Sabha Election 2024 : 'काँग्रेस व आघाडीला मत म्हणजे देशाच्या फाळणीला मत...'; भाजप प्रवक्त्यांचे वादग्रस्त विधान!
Dhananjay Munde
Sharad Pawar NCP Manifesto 2024: गॅस 500 रुपयांपर्यंत करणार, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शपथनामा

आरोप कुणावर?

धनंजय मुंडे (Dhananay Munde) यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केल्याचे आता बोलले जाते. धनंजय मुंडेंनी केलेल्या या आरोपाबाबत अद्यापतरी कोणतीही प्रतिक्रिया उमटल्या नाहीत. बारामती मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत मुंडे बोलत होते.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com