Pune BJP Executive : माधुरी मिसाळांच्या मुलाचे 'लाँचिंग'? पुणे भाजप कार्यकारिणीत दिली मोठी जबाबदारी

Madhuri Misal And Karan Misal : करण मिसाळ महापालिका निवडणुकीत उतरण्याची शक्यता
Karan Misal
Karan MisalSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : आगामी लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी कार्यकारिणी जाहीर केली आहे. पुण्याची पहिल्या टप्यातील ५० जणांची कार्यकारिणी घाटे यांनी जाहीर केली. त्यांनी आपल्या टीममध्ये महापालिकेतील कामांचा अनुभव असलेल्या जुन्या व नव्या चेहऱ्याना संधी दिली आहे. यातील एका नावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, ते म्हणजे करण मिसाळ. (Latest Political News)

भाजपच्या पुणे कार्यकारिणीत पहिल्या टप्प्यात महत्त्वाचे पदाधिकारीच फक्त घोषित करण्यात आले आहेत. इतर पदाधिकारी आणि सदस्य अद्याप नेमण्यात आलेले नाहीत. त्यानंतर ती पिंपरी-चिंचवडसारखीच ही कार्यकारिणी मोठी होण्याची शक्यता आहे. यात तूर्तास १८ उपाध्यक्ष, आठ सरचिटणीस, १८ चिटणीस आणि सहा मोर्चा अध्यक्षांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. यातील मोर्चा अध्यक्षांतील करण मिसाळ यांची नेमणूक लक्षवेधी आहे. या वेळी करण मिसाळ यांचे प्रमोशन केले असून, त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यातून मिसाळ कुटुंबातील राजकारणाचा वारसा पुढे चालू राहिला आहे.

Karan Misal
Pune BJP Executive : जुन्या नव्यांचा धीरज घाटेंनी घातला मेळ; ५० जणांची निवड करत बांधली मोट

करण हे पर्वतीच्या भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांचा मुलगा आहे. अगोदर भाजयुमोचे शहर सरचिटणीस म्हणून काम त्यांनी केले आहे. आता नव्या नियुक्तीने पक्षाच्या शहर बॉडीत जबरदस्त एन्ट्री झाली आहे. तीन टर्म आमदार असलेल्या माधुरी मिसाळांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.

मिसाळ यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाच्या निरीक्षक म्हणून काम पाहिलेले आहे. त्यांचे दीर बाबा मिसाळ हे पक्षाचे नेते असून, शहरात सरचिटणीस होते. आता त्यांच्या घरातून नवा चेहरा कोण याची उत्सुकता होती. त्यात करण यांनी बाजी मारली आहे. राघवेंद्र मानकर यांच्याकडे असलेले मोठे पद त्यांना देण्यात आले. त्यातून आगामी महापालिका निवडणुकीत तो उतरू शकतो, अशी चर्चा या नेमणुकीनंतर पुण्यात सुरू झाली आहे.

दरम्यान, या कार्यकारिणीतून पक्षांतर्गत विरोधकांना वगळल्याचे दिसून येते. त्यासोबतच जुन्या कार्यकारिणीतील काही जणांचे प्रमोशन झाले आहे, तर काही जणांना नवी जबाबदारी दिली आहे. हे करीत असताना सर्वच आठ विधानसभा मतदारसंघांतील सर्वच भागातील कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न घाटे यांनी केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Karan Misal
Karad Congress News : 'इंडिया'कडून पराभवाची मोदींना भीती; म्हणून देशाचे नाव बदलायला निघालेत : पृथ्वीराज चव्हाण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com