Dhirendra Krishna Shastri : बागेश्वर बाबांकडे जाणारे ते दोन नेते कोण ?

Dhirendra Krishna Shastri of Bageshwar Dham: धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबारात अनेक राजकीय मंडळी येतात
Dhirendra Krishna Shastri
Dhirendra Krishna Shastri Sarkarnama

चैतन्य मचाले

Pune News: रामभक्त हनुमानाचा आपल्याला आशीर्वाद असल्याने आपल्याकडे येणाऱ्या भक्तांचे गाऱ्हाणे ऐकत त्यांना मदत करण्याचे काम आपण करतो. आपल्या दरबारात सर्वसामान्य नागरिकांबरोबरच अनेक राजकीय मंडळी येतात. यापैकी बहुतांश नेते हे आपले वैयक्तिक प्रश्न घेऊन येतात.

यातील केवळ दोन नेते जनतेचे प्रश्न घेऊन आपल्याला भेटल्याचे बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी सांगितले. मात्र, या नेत्यांची नावे त्यांनी गुलदस्त्यात ठेवली आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर बागेश्वर बाबांना भेटणारे ते दोन नेते नक्की कोण ? याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Dhirendra Krishna Shastri
Bageshwar Baba : बागेश्वरबाबांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा; नेमकं काय म्हणाले...

पुण्यातील संगमवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या कार्यक्रमासाठी बागेश्वर बाबा सध्या पुणे दौऱ्यावर आलेले आहेत. वेगवेगळी वादग्रस्त वक्तव्यं करत बागेश्वर बाबा हे सतत चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी जाहीर माफीदेखील मागितली होती. नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी विविध शहरांत बागेश्वर बाबांचे मोठे दरबार भरतात.

या दरबारांमध्ये भक्तांची मोठी गर्दी उसळते. यामध्ये राजकीय मंडळींची उपस्थितीदेखील लक्षणीय असते. निवडणुका जवळ आल्या, की आपल्या वैयक्तिक भेटीसाठी येणाऱ्या राजकीय नेत्यांची संख्या मोठी असते. बहुतांश राजकीय नेते हे केवळ आपल्या समस्या आणि प्रश्नांसाठी येतात. आत्तापर्यंत केवळ दोन नेत्यांनी जनतेच्या प्रश्नांवर आपली भेट घेतली असल्याचे बागेश्वर बाबांनी स्पष्ट केले.

जनतेच्या प्रश्नांवर उपाय सूचविण्यासाठी भेट घेतलेल्या दोन नेत्यांची नावे मात्र बागेश्वर बाबा यांनी जाहीर केलेली नाही. "बाबा के पास आकर चुनाव जिते नही जाते, अगर आप जनता को बाबा मानोगे तो कही दुसरी जगह जाने की जरूरत भी नही," असा सल्लाही बागेश्वर बाबांनी राजकीय मंडळींना दिला आहे.

Edited by Ganesh Thombare

Dhirendra Krishna Shastri
Manoj Jarange: आरक्षणाचं काय झालं? समितीतील नेत्यांना जरांगे जाब विचारणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com