Dilip Mohite : 'उदय सामंत नावालाच मंत्री... उद्योग खातं किरण सामंत चालवतात'; मित्रपक्षाच्या माजी आमदारांचा जाहीर आरोप, चाकणचा प्रश्न आणखी पेटला

Uday Samant Chakan MIDC Problems : मंत्री उदय सामंत यांनी चाकणच्या समस्यांची पाहणी केली मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासत घेतले नाही. त्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील सामंत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
Uday Samant, Kiran Samant
Uday Samant, Kiran SamantSarkarnama
Published on
Updated on

हरिदास कड

Dilip Mohite News: चाकण एमआयडीसी समस्यांच्या संदर्भात सरकारकडून युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे प्रयत्न केले जात आहे. व्यवसायिकांच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून येथील समस्यांची दखल घेण्यात आली आहे. नुकतेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यवसायिकांशी बोलणे केले. तसेच येथीस समस्यांची पाहणी केली. मात्र, त्यांनी आपल्या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केल्याची चर्चा आहे. त्याला माजी आमदार दिलीप मोहित यांनी प्रत्युत्तर देत उदय सामंत नावालाच मंत्री असून उद्योग खातं त्यांचे बंधू किरण सामंत चालवत असल्याचा हल्लाबोल केला.

जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांनी चाकण वाहतूक कोंडी समस्या व इतर मागण्या संदर्भात गेल्या चार दिवसापासून उपोषण सुरू केले होते. ते उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.

गणेश बोत्रे यांची मनधरणी करण्यासाठी माजी आमदार दिलीप मोहिते ,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर,सभापती दीपाली हुलावळे,सभापती जितेंद्र बढेकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मोहिते पाटील म्हणाले, "उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. उद्योगमंत्र्यांनी बैठकीला बोलविले नाही . मुख्यमंत्र्या इतके अधिकार उपमुख्यमंत्र्यांना नाही. मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घ्यावे लागतील. काही धोरण राज्य पातळीवर घ्यायला पाहिजेत. स्व.अजितदादानी पाहणी केली बैठका घेतल्या त्यांच्या निधनानंतर काहीच प्रश्न सोडविले गेले नाही.रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मिळालेले दहा कोटी रुपये कुठे खड्ड्यात गेले. दोन वर्ष झाले तळवडे ते सँनी इंडिया कंपनी काँक्रीटीकरण का होत नाही. एका खिडकीखाली कामे का येत नाही. माजी उद्योगमंत्री देसाई यांनी त्यांच्या उद्योग खात्याचे काम स्वतः चालविले नाही. त्यांच्या मुलाने चालविले. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे काम त्याच्या भावांनी चालविले आहे.'

Uday Samant, Kiran Samant
Maharashtra Kotwal Recruitment: महसूल विभागात मोठी भरती! 2 हजार 122 कोतवाल पदे भरणार; पुण्यात 149 जागा

'उद्योगमंत्र्यांनी येथे अनेक घोषणा केल्या. त्यांच्या कार्यकर्त्यांनी टीका करताना मुक्ताफळे वाहिली. ती चुकीची आहे.शरद पवारसाहेबांनी कामे केली.अजितदादानी काय काम केले. चुलत्या, पुतण्याने वाटोळे केले.राष्ट्रवादीने वाटोळे केले. अशी मुक्ताफळे काही कार्यकर्त्यांनी वाहिली. परंतु राष्ट्रवादीने जे काम केले ते कोणीच केले नाही. गणेश बोत्रे यांनी आंदोलन केले त्यांच्या पाठीमागे आम्ही आहोत . १० कोटी रुपये खड्डे बुजवण्यासाठी लागतात का?' असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

...तर पुन्हा उपोषण

प्रशासनाकडून कार्यवाही झाली नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरणार असा कडक इशारा उपोषणकर्ते गणेश बोत्रे यांनी दिला आहे. येत्या सात दिवसांत अतिक्रमण काढण्याचे व खड्डे भरण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

जिल्हापरिषद सदस्य गणेश बोत्रे यांनी खालुंब्रे (ता. खेड) येथील एचपी चौकात दोन दिवस साखळी उपोषण आणि त्यानंतर आमरण उपोषण सुरू केले होते.चार दिवस उपोषण सुरू होते. एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, प्रांताधिकारी अनिल दौंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपोषणस्थळी आले होते. त्यांनी गणेश बोत्रे यांची मनधरणी केली. चर्चे नंतर गणेश बोत्रे यांनी उपोषण मागे घेतले.

Uday Samant, Kiran Samant
Maharashtra Politics Live Update : जालना शहरातील रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा संताप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com