Shirur News : लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी (ता.13) पार पडत आहे. महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात पुणे, शिरूर,मावळ यांसह नंदूरबार,नगर, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर,शिर्डी आणि बीड अशा एकूण 11 मतदारसंघाचा समावेश आहे. राजकीय नेतेमंडळींसह, सेलेब्रिटी यांच्यासह मतदारांनी सकाळपासूनच मतदानाचा हक्कही बजावण्यासाठी घराबाहेर पडत आहे. काही ठिकाणी तर मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत तर काही ठिकाणी संथगतीने मतदान सुरू आहे.याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यानं केलेल्या विधानामुळे महायुतीत खळबळ उडाली आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरची ही सर्वात मोठी निवडणूक आहे.ही निवडणूक भाजपसह शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गट तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार - अजित पवार (Ajit Pawar) गटाने प्रतिष्ठेची केली आहे. शरद पवारांचे विश्वासू मानले जाणारे आणि सध्या अजित पवार गटात असलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी त्यांनी या निवडणुकीत शरद पवारांना सहानुभूतीची लाट मिळेल असं विधान केलं आहे. वळसे पाटलांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.एकीकडे शिंदे गटातील नेत्यांनी बंडामागच्या भूमिका स्पष्ट करताना केलेल्या वक्तव्याची चर्चा थांबत नाही तोच आता वळसे पाटलांची विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) हे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणांमुळे राजकारणापासून अलिप्त आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही ते सक्रिय नव्हते. पण आजारी असतानाही त्यांनी सोमवारी व्हिलचेअरचा आधार घेत मतदान केले. यावेळी त्यांनी मनातील खंत बोलून दाखवतानाच तब्येतीच्या कारणाने सक्रिय प्रचारात सहभागी होता आलं नाही असं म्हटलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तसेच लोकसभा निवडणूक ही नेहमी देशाच्या मुद्द्यांवर लढली जाते.पण यंदा पहिल्यांदाच याने काय म्हटले आणि त्याने काय म्हटले यावर ही निवडणूक लढवली जात आहे.मात्र,या लोकसभा निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) यांना सहानुभूतीची लाट मिळेल,असं ते म्हणाले आहेत.
वळसे पाटील म्हणाले, सध्या मी राजकीय प्रवाहापासून बाहेर आहे. पहिल्यांदाच असं घडलं आहे. आजारी असल्यामुळे मला प्रचारात सहभागी होता आलं नाही.यावेळी त्यांनी लोकांना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन करतानाच आपल्या आवडीचं आणि देशाचं हित करणारं सरकार आलं पाहिजे असंही मत व्यक्त केलं.
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे घरात पाय घसरून पडल्याने हात पाय आणि खुब्याला दुखापत झाली होती.त्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.डॉक्टरांच्या सल्ल्याने वळसे-पाटील यांच्या हात आणि पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली.सध्या ते घरी आहेत. पण त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होता आलं नाही.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.