Dilip Walse Patil : वळसे पाटलांच्या मतदारसंघावर शिंदे गटाचा डोळा ; म्हणाले,' त्यांनी नाईलाजास्तव निवडणूक लढवण्याऐवजी...'

NCP Vs Shivsena Political News : महायुतीत मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघावरुन वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.
Eknath shinde, ,Dilip Walse Patil
Eknath shinde, ,Dilip Walse Patil Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पाहिले जात होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरी उफाळून आल्यानंतर नाही नाही म्हणता 'साहेबां'ची साथ सोडत वळसे पाटील हे अजित पवारांसोबत गेले. पण आता बंडखोर नेत्यांच्या करेक्ट कार्यक्रमासाठी शरद पवार मैदानात उतरले असतानाच वळसे पाटलांची मुलगी पूर्वा वळसे पाटील या विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या आंबेगावमध्ये दाखल झाली होती.यादरम्यान,वळसे पाटलांनी माझी मुलगी विधानसभेची निवडणूक लढायला तयार नसल्यामुळे मला नाईलाजास्तव आंबेगावची निवडणूक लढवावी लागणार असल्याचं विधान केलं होतं.आता त्यांच्या याच विधानावर शिवसेना शिंदे गटानं संधी साधली आहे.

महायुतीत मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil ) यांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघावरुन वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत. दिलीप वळसे पाटील यांनी आपण नाईलाजास्तव यंदाची विधानसभा निवडणूक आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून लढवणार असल्याची भूमिका जाहीर केल्यावर आता शिवसेना शिंदे गटाने या जागेवर दावा ठोकला आहे.

शिंदे गटाचे नेते सचिन बांगर यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला (Shivsena) सोडण्याची मागणी केली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आंबेगावची जागा आपल्याकडे घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.बांगर म्हणाले, नाईलाजास्तव निवडणूक लढण्यापेक्षा दिलीप वळसे पाटलांनी शिवसेनेला ही जागा सोडावी,यानिमित्ताने आंबेगावमध्ये भगवा फडकविण्याचं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्नंही पूर्ण होईल अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.

Eknath shinde, ,Dilip Walse Patil
Bjp News : फडणवीसांच्या जवळच्या नेत्याच्या तोंडी महायुती तोडण्याची भाषा; म्हणाले, 'भाजपही मनावर दगड ठेवूनच...'

महायुतीतील शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेतेमंडळींकडून जागा वाटपावर वेगवेगळी विधानं केली जात आहे. तसेच वेगवेगळ्या आरोप- प्रत्यारोपांवरुन महायुतीत आधीच खटके उडत असतानाच आता आंबेगावच्या जागेवरुन नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मावळ, खेड,इंदापूर, जुन्नर, हडपसर यांसारख्या अनेक जागांवरुन उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकमेकांच्या जागा बळकावतानाच इतर मित्र पक्षांच्या नाराजीचा फटकाही महायुतीला बसणार असल्याचे बोलले जात आहे.

वळसे पाटील नेमकं काय म्हणाले होते...?

मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, लोक अशी बातमी उठवतात की, दिलीप वळसे पाटील निवडणूक लढवणार नाही, तर त्यांची मुलगी रिंगणात उतरणार आहे. पण माझी कन्या निवडणूक लढवण्यास अजिबात तयार नाही. त्यामुळे नाईलाजाने मलाच निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सुरू असलेली सर्व कामे आपल्याला पुढे घेऊन जावे लागणार आहेत, असे म्हणत दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून शड्डू ठोकला आहे.

विधानसभेची निवडणूक लवकरच लागणार आहे. ही निवडणूक आपल्याला मोठ्या ताकदीने आणि हिंमतीने लढवायची आहे. जिंकायचे पण आहे आणि ती आपण जिंकणारच आहोत आहोत असेही वळसे पाटील यांनी ठणकावून सांंगितले.

Eknath shinde, ,Dilip Walse Patil
Pandharpur News : पैसे घेऊन विठ्ठलाचे 'VIP' दर्शन देणं भोवलं, पंढरपुरात शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com