Dnyaneshwar Ghodekar : जिल्हा परिषद निवडणुकीआधी राष्ट्रवादीला मोठा धक्का! ज्ञानेश्वर घोडेकरांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Ambegaon Shivsena Politics : घोडेगावचे ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर घोडेकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आंबेगाव तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली असून जिल्हा परिषद निवडणुकीआधी राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
Senior NCP leader Dnyaneshwar (Mauli) Ghodekar being welcomed into Shiv Sena by Deputy CM Eknath Shinde in Mumbai, in presence of district president Devidas Darekar.
Senior NCP leader Dnyaneshwar (Mauli) Ghodekar being welcomed into Shiv Sena by Deputy CM Eknath Shinde in Mumbai, in presence of district president Devidas Darekar.Sarkarnama
Published on
Updated on

Pune Ambegaon Shivsena News : घोडेगाव ( ता आंबेगाव ) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली) घोडेकर यांचा शिवसेनेत मुंबई येथे जाहीर प्रवेश झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख देवीदास दरेकर उपस्थित होते.

त्यांच्या अचानक झालेल्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषद निवडनुकीच्या तोंडावर हा धक्का बसला आहे. याचा परिणाम आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला घोडेकर यांच्या प्रवेशाने ताकद मिळणार आहे.

ज्ञानेश्वर घोडेकर हे घोडेगाव येथील माळी समाजाचे जेष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना खरेदी विक्री संघावर संचालक म्हणून व अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. घोडेगाव ग्रामपंचायत मध्ये ते दहा वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत होते. त्यांच्या राजकीय जनसंपर्काचा आणि अनुभवाचा शिवसेनेला आगामी निवडणूकीत फायदा होईल असे बोलले जात आहे.

Senior NCP leader Dnyaneshwar (Mauli) Ghodekar being welcomed into Shiv Sena by Deputy CM Eknath Shinde in Mumbai, in presence of district president Devidas Darekar.
Pune ZP Election : पुणे जिल्हा परिषदेच्या मैदानात अजितदादांचा खास प्लॅन; भाजपला रोखण्यासाठी बारामती पंचायत समितीत तडजोड?

महात्मा फुले ग्रामीण पतसंस्थेचे ते माजी अध्यक्ष आहेत. माळी समाजाचे मतदान शिवसेनेकडे घेण्याचा प्रयत्न जिल्हाप्रमुख देवीदास दरेकर यांच्याकडून होताना दिसत आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे बोलले जात आहे.

Senior NCP leader Dnyaneshwar (Mauli) Ghodekar being welcomed into Shiv Sena by Deputy CM Eknath Shinde in Mumbai, in presence of district president Devidas Darekar.
Pune ZP Election : पुणे जिल्हा परिषदेच्या मैदानात अजितदादांचा खास प्लॅन; भाजपला रोखण्यासाठी बारामती पंचायत समितीत तडजोड?

ज्ञानेश्वर घोडेकर यांचा पक्ष प्रवेश आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बदलणारा ठरणार असल्याचे बोलले जात आहे. घोडेकर यांनी आपण विकासकामांना गती देण्यासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com