Dr. Babasaheb Ambedkar: आंबेडकरांचा वाढदिवस पहिल्यांदा कुठे साजरा झाला होता? हत्तीच्या अंबारीत बाबासाहेबांची प्रतिमा...

Dr Babasaheb Ambedkar first birthday celebration in Pune: बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून, उंटावरून मोठी मिरवणूक काढली होती.
Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Dr Babasaheb Ambedkar Jayanti history: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आज देशभर साजरी होत आहे. पण बाबासाहेबांचा पहिला वाढदिवस देशात सार्वजनिकपणे कुठे साजरा झाला होता, हे तुम्हाला माहीत आहे का?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला सार्वजनिक वाढदिवस पुण्यात प्रथमच १४ एप्रिल १९२८ रोजी सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी साजरा केला, बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा त्यांनीच सुरू केली. ते आंबेडकर जयंती समारंभाचे शिल्पकार ठरले.

उंटावरून मोठी मिरवणूक

जनार्दन सदाशिव रणपिसे हे खडकी पत्र विभाग दलित मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी बाबासाहेबांच्या जयंती निमित्त यांनी बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून, उंटावरून मोठी मिरवणूक काढली होती यानंतर खडकी भागात प्रत्येक वस्तीत आंबेडकरांची जयंती साजरी होऊ लागली. या सर्व वस्त्यांचे भाऊसाहेबांनी एकीकरण घडवून दलित मंडळाची स्थापना केली. या मंडळातर्फे आंबेडकरांची जयंती भव्य प्रमाणात साजरी केली. आजही देशभर आंबेडकरांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते, पण त्यांचे शिल्पकार हे जनार्दन सदाशिव रणपिसे हे आहेत.

नवी सुधारणा

रणपिसे यांनी समाजातील अनीती व जुन्या चालीरितीविरुद्ध पुण्यात मोठी चळवळ उभारून सामाजिक व शैक्षणिक कार्य केले. २४ ऑगस्ट १९५८ रोजी रणपिसे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळीने पुणे शहरात त्यांचा भव्य सत्कार समारंभ घडवून आणला होता. त्यात ठ.रा. पाडळे, ए.एस. कांबळे, जे.एस. भाऊसाहेब रणपिसे, वि.रा. रणपिसे (संपादक 'बोधिसत्त्व'), रा.तु. कांबळे, डी.टी. कांबळे, के. डी. भोसले आदी मान्यवरांचा समावेश होता. भाऊसाहेबांनी विद्यार्थ्यांसोबतच अस्पृश्यवर्गाची जी बहुमोल सेवा केली.

Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkar: वडिलांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आंबेडकरांनी केलं होतं धर्मांतर; असा झाला ऐतिहासिक सोहळा; पण..

सुशिक्षितांमध्ये नवचैतन्य

रणपिसे हे पुणे जिल्ह्यातील दलित समाजातील ते पहिले मॅट्रिक्युलेट झाले यातच त्यांचा मोठेपणा आहे! मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये दोन वर्षे अभ्यास केला. १९१८ ते २१ साली त्यांनी सन्मार्ग दर्शक मंडळाची स्थापना करून सामाजिक सभा, संमेलने, मौलिक व्याख्याने, नाटके, प्रौढांकरिता रात्रीचे वर्ग चालवले. सोबतच व्यायामशाळा काढून तरुण सुशिक्षितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkar: बौद्ध धर्मच का स्वीकारला? आंबेडकरांनी सांगितले होते कारण...

कमांडर इन चीफ

महार सेवादलाची त्यांनी स्थापना केली. तिचे ते कमांडर इन चीफ बनले, राजकारण जास्त केले नाही, परंतु सामाजिक कार्याचे ते अर्ध्वयू होते. समाजकार्यात व्यांचा मोठा वाटा आहे.

भाऊसाहेब रणपिसे

पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र, तीन हजार रुपये प्रेस फंड, पाच हजार रुपये इमारत फंड जमवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पुण्यात युवक परिषद भरवली गेली ती पुणे जिल्ह्याकरिता किंवा शहरासाठी नव्हती. त्यात संबंध महाराष्ट्रातील प्रतिनिधी आले होते. १९३९ साली कायदे मंडळात चौदाही प्रतिनिधी निवडून गेले. त्याचे श्रेय भाऊसाहेब रणपिसे यांचेकडे ओघानेच जाते.

आंबेडकरांचा पाठिंबा

जुन्या चालीरितीविरुद्ध रणपिसे यांनी मोठी चळवळ केली है पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कार्याला नारायणगाव परिषदेत पाठिंबा दिला होता यावरून त्यांच्या कार्याची कल्पना येते.

(संदर्भः मिलिंद मानकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींचे ज्येष्ठ संग्राहक)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com