भर कार्यक्रमातच अजित पवारांसमोर तक्रार; बारामतीचे प्रांत पाच लाख मागत आहेत...

अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

बारामती : स्वताःच्या गावातच दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासमोरच एका ग्रामस्थाने थेट उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यावर कामासाठी पैसे मागितल्याचा आरोप केला. यामुळे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Ajit Pawar News)

काटेवाडी येथे एक तास राष्ट्रवादी (Ncp) पक्षासाठी या उपक्रमाअंतर्गत स्वतः अजित पवार यांनीच आज वेळ देत लोकांचे म्हणणे ऐकून घेतले. लोकांशी चर्चा करत असतानाच एका शेतक-याने उभे राहत भूसंपादनाच्या कामामध्ये पोटहिस्से करुन दिले नाहीत. मुद्दाम अडथळे आणले, पाच लाखांची मागणी केली असा जाहिर आरोपच केला. थेटपणे झालेल्या या आरोपानंतर काही काळ वातावरणातही तणाव निर्माण झाला होता.

Ajit Pawar
बिबट्या सफारीचा पट्टा आपल्याच हाती, चिंता नको : सचिन अहिरांचे जुन्नरकरांना आश्वासन

दादासाहेब कांबळे यांनीही तातडीने भूसंपादन प्रक्रीयाच झालेली नाही, त्या मुळे हा आरोपच चुकीचा असल्याचे अजित पवार यांना सांगितले. अजित पवार यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर संबंधित शेतकरी अजित देवकाते यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आपल्या दोघांच नाव एकच आहे, मी इतक्या संयमाने बोलतो आहे, तुम्ही पण शांततेने घ्या, जे काही काम असेल ते मार्गी लावून देतो, असे सांगत या विषयावर पडदा पाडला.

Ajit Pawar
IAS पूजा सिंघल ईडीच्या ताब्यात ; १९ कोटीचं सापडलं घबाड, अधिकारीही चक्रावले !

या प्रकाराची कार्यक्रमानंतर मात्र खमंग चर्चा झाली. अनेकांकडून अनेक सुरस कहाण्या सांगितल्या गेल्या. दादांनी कडक भूमिका घ्यायलाच हवी, अशीही मागणी काही ग्रामस्थांनी केली. प्रशासकीय भवन येथे अनेक कार्यालयात दलालांचा वावर आणि होणारी अडवणूक या बाबतही आता अजित पवार यांच्याकडेच तक्रारी करणार असल्याचे ग्रामस्थांनी बोलून दाखविले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com