CM Eknath Shinde : 'पुण्यातच नाही तर महाराष्ट्रभर बुलडोझर फिरणार' ; मुख्यमंत्री शिंदेंचा कडक इशारा!

Eknath Shinde on Drug Cases in Maharashtra : ड्रग्ज प्रकरणांमध्ये कुठल्याही परिस्थितीत कुणालाही पाठीशी घालण्याचं काम होणार नाही, असंही स्पष्ट केलं आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

CM Shinde in Pune News : पुण्यामध्ये सातत्याने समोर येणाऱ्या ड्रग्ज प्रकरणावर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला कठोर पावलं उचलण्याच्या सूचना देत थेट अनधिकृत पब व बार वर बुलडोजर चालवण्याच्या आदेश दिले आहेत.

ही बुलडोझर कारवाई संबंध महाराष्ट्रात सुरू करणार असल्याचे विधानही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) शनिवारी पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्याशी माध्यमांशी संवाद साधला एकनाथ शिंदे म्हणाले, 'पुण्यातील अनधिकृत पब, बार, हॉटेल आणि ड्रग्ज विक्रीची जी कुठली ठिकाणे असतील किंवा शाळा कॉलेजच्या बाजूला ज्या काही टपऱ्या असतील ते सर्व बुलडोझर लावून तोडण्याचे आदेश मी पुणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

CM Eknath Shinde
Uddhav Thackeray : पुणे ड्रग्ज प्रकरणावरून ठाकरेंनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारची काढली लक्तरे !

ड्रग्ज प्रकरणांमध्ये कुठल्याही परिस्थितीत कुणालाही पाठीशी घालण्याचं काम होणार नाही. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल. तरुण पिढी बरबाद करण्याचे काम जे कोणी लोक करत आहेत. त्यामध्ये ड्रग्स विक्रेते, पेडलर किंवा सप्लायर्स असतील त्यांची पाळमूळ शोधून नष्ट करण्याच्या सूचना आणि आदेश मी दिलेले आहेत.

प्रशासन त्यामध्ये तत्पर कारवाई करेल. जे अधिकारी कामात दिरंगाई करतील त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई केली जाईल.' असंही शिंदे म्हणाले.

शिंदे पुढे म्हणाले, 'महाराष्ट्रात कुठेही ड्रग्जचा व्यापार खपवून घेतला जाणार नाही. सरकार यावर काम करत आहे, सगळ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. प्रामाणिक पुण्यामध्ये कारवाई सुरू आहे त्याच प्रकारची कारवाई सगळीकडे करण्यात येईल.'

CM Eknath Shinde
Eknath Shinde : "आमच्या बेट्याचं काय करायचं ते पाहू, तुमचा लाडला बेटा वर्षावर बंगल्यावर बसून..."

लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांकडून होत असलेल्या टीकांना उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, या योजनेत थेट लाभार्थी बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये वर्ग केले जातील. त्याचा जीआर आम्ही काल काढलेला आहे. 01 जुलैपासून अंमलबजावणी होईल. ही स्वतंत्र योजना असून संजय गांधी निराधार योजना आणि श्रावबाळ योजना सुरूच राहील असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com