

Kolhapur News, 13 Oct : पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आरोग्यदूत अशी ओळख असलेल्या मंगेश चिवटे यांनी माघार घेतल्यानंतर भाजप व शिवसेनेतील मतभेद समोर येत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेने'कडून शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांचे कारण समोर करून थेट भाजपला इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे.
तब्बल दहा हजार पाचशे शिक्षक मतदारांनी पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकी संदर्भात एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना यांच्याकडून बहिष्काराची भूमिका जाहीर केली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब आडसूळ यांनी या निवडणुकीत संघटनेशी संबंधित १० हजार ५०० शिक्षक मतदार मतदान प्रक्रियेपासून दूर राहतील, अशी घोषणा आज पत्रकार परिषदेत केली.
शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शिक्षकांच्या न्याय मागण्या आणि शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची भूमिका संघटनेने मांडली. शिक्षकांच्या प्रश्नांना योग्य न्याय मिळावा आणि त्यांच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय व्हावेत, यासाठी संघटनेने ही भूमिका घेतल्याचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ यांनी स्पष्ट केले.
शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून, त्यांच्या समस्या सोडविणे ही शासन आणि संबंधित यंत्रणांची जबाबदारी आहे. शिक्षकांच्या प्रश्नांकडे दर्लक्ष होत असल्यास संघटनेच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने आवाज उठविण्यात येईल, असा निर्धारही आडसुळ यांनी व्यक्त केला.
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्रांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली जावी, ही ठाम भूमिका असल्याचे सांगत. शिक्षकांच्या हितासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील राहील, असे अडसूळ यांनी स्पष्ट केले. या घोषणेमुळे आगामी पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेची भूमिका चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.