Eknath Shinde On Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांचा शिवसेनेत प्रवेश होताच एकनाथ शिंदेंनी भाजपला डिवचले, म्हणाले 'हू इज...'

Eknath Shinde Taunts BJP Ravindra Dhangekar Joins Shiv Sena : रवींद्र धंगेकरांची पुण्यामध्ये लोकप्रिय लोकनेता म्हणून ओळख आहे. सर्वसामान्य माणसाला मदत कशी करायची हे त्यांना चागंले माहीत आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekarsarkarnama
Published on
Updated on

Ravindra Dhangekar News : काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे यांनी धंगेकरांचे स्वागत करताना त्यांच्या सारखा कार्यकर्ता शिवसेनेत हेत आहे याचा आनंद व्यक्त केला. पोटनिवडणुकीत त्यांच्या विरोधात सगळी फौज लागली होती मात्र तरी देखील ते विजयी झाले होते, असे शिंदे म्हणाले.

पोटनिवडणुकीच्या वेळी चंद्रकांत पाटील यांनी हू इज धंगेकर असा प्रश्न केला होता. शिवसेना पक्षप्रवेशावेळी हू इज धंगेकर हे आत्ता जनतेला कळेल, असे म्हणत अप्रत्यक्ष भाजपलाच टोला लगावला.

'रवींद्र धंगेकरांची पुण्यामध्ये लोकप्रिय लोकनेता म्हणून ओळख आहे. त्यांच्या कामाने त्यांची ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्य माणसाला मदत कशी करायची हे त्यांना चागंले माहीत आहे. त्यांच्या विरोधात सगळी फौज लागली असताना त्यांनी बाजी मारली होती. लोकसेवक काय असतो हे त्यांनी दाखवले. लोकांना कळेल हू इज धंगेकर.', असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Ravindra Dhangekar
MLA Sandip Kshirsagar News : बीडमध्ये ऑडिओ-व्हिडिओ 'वाॅर'! आमदार संदीप क्षीरसागर यांनी तहसीलदाराला धमकी दिल्याची क्लीप व्हायरल..

एकनाथ शिंदे म्हणाले, 'शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी देखील कार्यकर्ता आहे. त्यामुळे येथे काम करणाऱ्या संधी मिळते. मी कार्यकर्ता होतो लोकांनी मला डोक्यावर घेतलं. 2022 ला क्रांती झाली. राज्या देशानेच नाही तर जगातल्या 33 देशांनी दखल घेतली व्हू इज एकनाथ शिंदे.',

शिवसेनेत उशीरा आल्याचे दुखः होईल

एकनाथ शिंदे म्हणाले, रवींद्र धंगेकर सकाळी म्हणाले काँग्रेस सोडताना दुःख होतंय पण थोड्या दिवसांनी तुम्हाला वाटेल की शिवसेना तू उशिरा आलो याचं दुःख आहे. पुण्यामध्ये मोठी टीम तयार करा. तुम्हाला कधीही दुःख वाटणार नाही की आपण शिवसेनेमध्ये का आलो.उदय सामंत यांचा पण अभिनंदन कारण त्यांनी हा योग घडवून आणला कार्यकर्ताच असे काम करू शकतो.

Ravindra Dhangekar
Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीवेळची 'ती' चूक उद्धव ठाकरे मान्य करणार का ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com