Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीवेळची 'ती' चूक उद्धव ठाकरे मान्य करणार का ?

Assembly Elections 2024 News : विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट या तीन पक्षाकडून मात्र या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले होते.
Shivsena News
Shivsena NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभव स्वीकारावा लागला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीकडे येणाऱ्यांचा ओढा वाढला होता. विधानसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीकडे इच्छुक मोठया प्रमाणात आले होते. त्यामुळे एकीकडे कॉन्फिडन्स वाढला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या लाटेत आघाडीला मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप केला जात होता. पण आता अखेर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या निर्धार शिबिरात विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामागील सर्व कारणेच शिवसैनिकासमोर सांगितली.

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट या तीन पक्षाकडून मात्र या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले होते. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप या सर्वच पक्षाने केला होता. त्यामुळे काही जणांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. तर काही जणांनी फेरमतमोजणीची मागणीही केली होती. त्यामुळे राज्यातील वातावरण तापलेलेच होते.

Shivsena News
Eknath Shinde : सभागृह गाजवणाऱ्या ठाकरेंच्या 'या' फायरब्रँड नेत्याला एकनाथ शिंदेंनी दिली खुली ऑफर

माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालामध्ये ईव्हीएमबाबत शंका घेत मारकडवाडी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. याबाबत त्यांनी प्रशासनाकडे बॅलेट पेपरवर चाचणी मतदानाची मागणी केली होती. मात्र ही मागणी प्रशासनाने फेटाळली होती. त्यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे वातावरण काही काळ ढवळून निघाले होते. मात्र, रविवारीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित निर्धार शिबिर पार पडले. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कुठे कमी पडली याचे कारणच सांगितले.

Shivsena News
Uddhav Thackeray on Budget : अजितदादांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे भडकले; म्हणाले, 'महाराष्ट्र खड्ड्यात..'

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एक नक्की मान्य केले पाहिजे की, आपण गाफील राहिलो. लोकसभेला आपण आपल्याला जिंकायचंच आहे म्हणून लढलो, त्वेषाने लढलो. तर महायुती लोकसभेला आपणच जिंकणार कारण मोदी आहेत अशा अविर्भावात होते, त्यामुळे त्यांचा लोकसभेत पराभव झाला तर विधानसभेत आपला पराभव झाला असल्याचे उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) म्हणाले.

Shivsena News
Ajit Pawar Budget 2025 Live : सत्ता मिळवून देणाऱ्या लाडक्या बहिणींचा भ्रमनिरास; अजितदादांकडून 'ती' घोषणा नाहीच...

लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका आल्या. मधल्या काळात मतदारांचे घुसवाघुसवी झाली. आपण ज्या मानसिकतेत होतो की, आपल्याला जिंकायचंच आहे त्या मानसिकतेत महायुती होती आणि आम्ही जिंकलो आहोत, अगदी आपले मित्रपक्ष सुद्धा जॅकेट शिवून तयार होते. बस आता जिंकलोच, मी घोड्यावर बसणार आणि विधानसभेत जाणार. त्या निकालानंतर मला काही जणांनी सांगितले, असल्याचे ठाकरे म्हणाले.

Shivsena News
Ajit Pawar : सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला वानखेडेंनी; अजित पवारांचा नंबर कितवा?

अडीच वर्षाच्या काळात आपण उत्तमरित्या सरकार चालवून दाखवले आहे. जगभरात आणीबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती होती. त्यावेळीही आपण महाराष्ट्र थांबू दिला नव्हता. हे आपण लोकांना सांगूच शकलो नाही. तेच काम त्यांनी केलं. भ्रष्टाचाराचा नुसता आगडोंब केला. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप केला जात होता. पण आता अखेर उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे कारणच सांगितले आहे.

Shivsena News
Solapur Shivsena UBT : ठाकरेंकडून तिसऱ्याच दिवशी डॅमेज कंट्रोल; शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुखपदाची धुरा पुन्हा तरुण शिवसैनिकाच्या खांद्यावर

विधानसभा निवडणुकीत नक्की काय झाले होते. यावरून महाविकास आघाडी व महायुतीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात होते. आघाडीकडून ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला जात होता. तर दुसरीकडे महायुतीकडून पराभवाचे कारण शोधून त्यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे या एकमेकांवरील आरोपाने वातावरण तापले होते. मात्र, आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेते उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीतील पराभवाचे कारण सांगत आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरु करण्याचे सांगत महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Shivsena News
Mahayuti vs MVA: मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही अधिवेशनात सरकारला घेरण्याची संधी घालवली; सत्ताधारी फॉर्ममध्ये तर विरोधक 'बॅकफूट'वरच

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com