Ajit pawar latest news : सरकारमध्ये आले तरी, अजितदादांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट नाही, चौकशी सुरूच राहणार; भाजप आमदार भारतीयांचा दावा!

Ajit pawar latest news : "नरेंद्र मोदी हेच देशाचे पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे, असे एखाद्या दुसऱ्या राजकीय पक्षाला वाटावे हे महत्त्वाचे आहे.."
Ajit pawar latest news :
Ajit pawar latest news : Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pipmri Chinchwad News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) बंड करीत समर्थकांसह भाजप-शिवसेनेच्या (BJP - Shivsena) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (ता.२) सामील झाले. त्यांचा हा निर्णय राज्यातील साडेबारा कोटी जनतेच्या हितासाठी घेतलेला आहे, या शब्दात त्याचे समर्थन भाजपचे प्रदेश महासचिव तथा विधानपरिषद सदस्य श्रीकांत भारतीय (Shrikant Bharatiy) यांनी मंगळवारी (ता.४) पिंपरीत केले.

Ajit pawar latest news :
Maharashtra Politics : सकाळच्या शपथविधीनंतर शिवसेना आमदार ठाकरेंना म्हणाले, " काहीही करा पण .." ; देशमुखांचा गौप्यस्फोट

शिंदे फडणवीस सरकार स्थापन्यामागेही सर्वसामान्य माणसाचे हित, हेच ध्येय होते.अजितदादांचाही हा निर्णय सामान्यांच्या हिताचा अजेंडा असेल तर, तो जनता नक्कीच स्वीकारतील, असे श्रीकांत भारतीय म्हणाले.आम्ही कोणताही पक्ष फोडलेला नाही, तेच आमच्याकडे आले आहेत. तसेच ते (अजित पवार) भाजपमध्ये आले नसून सरकारमध्ये सहभागी झाले आहेत, याकडे लक्ष वेधत सिंचन घोटाळ्यातून कोणताही क्लीन चीट त्यांना देण्यात आलेली नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.

सिंचन घोटाळ्याची चौकशी चालू आहे, असे त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी हेच देशाचे पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे, असे एखाद्या दुसऱ्या राजकीय पक्षाला वाटावे हे महत्त्वाचे आहे, अशी टिपण्णी त्यांनी अजितदादांच्या यासंदर्भातील वक्तव्यावर केली. पिंपरी- चिंचवड पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालापात ते बोलते होते. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपचे शहर सरचिटणीस अॅड. मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे तसेच राजेश पिल्ले, आदी यावेळी उपस्थित होते.

Ajit pawar latest news :
Nilesh Lankhe On NCP Crisis : 'मला काहीही नको, पण पवार परिवार एक असावा ही परमेश्वराकडे प्रार्थना'; आमदार लंकेंची भावना !

चांगली कामगिरी केल्याबद्दल भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पीआय राजेंद्र निकाळजे, पुणे महापालिकेचे साहित्यिक कर्मचारी वि.रा.मिश्रा यांचा लोकहितवादी पुरस्कार देऊन पत्रकार संघाने यावेळी गौरव केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ होते. प्रस्ताविक अरुण कांबळे, सूत्रसंचालन माधुरी कोराड, तर आभार गोविंद वाकडे यांनी मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com