Crime News : जलसंपदा अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्यांनी थेट पूल उभारण्यास मंजुरी! ​सिंचन भवनातूनच 'बोगस' कारभार?

Fake Bridge Approval : जलसंपदाविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या स्वाक्षरी असलेल्या शासकीय मंजुरीपत्राद्वारे पूल उभारण्यात येणार होता. मात्र, हे मंजुरपत्र आणि त्यावरील अधिकाऱ्याची स्वाक्षरी बनावट असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Police have registered an FIR after forged signatures of senior Irrigation Department officials were allegedly used to secure approval for a bridge construction project.
Police have registered an FIR after forged signatures of senior Irrigation Department officials were allegedly used to secure approval for a bridge construction project.sarkarnama
Published on
Updated on

Pune News : जलसंपदा विभागाच्या नावाने बनावट शासकीय मंजुरीपत्र तयार करून पुण्यातील एका नामांकित डेव्हलपर कंपनीची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण गैरव्यवहारात महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या एका सहायक अधीक्षक अभियंत्याचा थेट सहभाग असल्याचे समोर आले असून, या प्रकरणी कंत्राटदारासह संबंधित अधिकाऱ्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणात राजेंद्र विष्णू सावंत, सहायक अधीक्षक अभियंता, सिंचन भवन, मंगळवार पेठ, पुणे आणि गौरव देवराव डहाळे कन्सल्टंट यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिकारी श्रीजीत प्रवीण थोरात यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार ७ जानेवारी ते ११ जुलै या कालावधीत घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,कन्ट्रक्शनमध्ये काम करणाऱ्या पुण्यातील एका नामांकित कंपनीला मावळ तालुक्यातील दारुंब्रे येथील कासारसाई डाव्या कालव्यावर स्वखर्चाने पूल उभारणी करायची होती. शासकीय नियमांनुसार, यासाठी जलसंपदा विभागाची रीतसर परवानगी आवश्यक होती. हे काम करून घेण्याची जबाबदारी कंपनीने कंत्राटदार गौरव डहाळे याच्यावर कन्सल्टंट म्हणून सोपवली होती.

Police have registered an FIR after forged signatures of senior Irrigation Department officials were allegedly used to secure approval for a bridge construction project.
PMC: पुणे महापालिकेचे बनावट लेटरहेड, IT चे बोगस सर्टिफिकेट; पुण्यात बेरोजगार तरुणांची लाखोंची फसवणूक, गृहविभागाची 'सुमोटो' चौकशी

काम लवकर पदरात पाडून घेण्यासाठी कंत्राटदार गौरव डहाळे आणि महामंडळाचे अधिकारी राजेंद्र सावंत यांनी हातमिळवणी केली. दोघांनी संगनमत करून थेट जलसंपदा विभागाच्या नावाने एक हुबेहूब बनावट मंजुरीपत्र तयार केले. त्यावर विभागाचा खोटा जावक क्रमांक टाकला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या देखील केल्या. हे पत्र अधिकृत असल्याचे भासवून ते कन्स्ट्रक्शन कंपनीला सुपूर्द करण्यात आले.

असा झाला भांडाफोड...

कंपनीकडून जेव्हा या कामाच्या कागदपत्रांची अंतिम पडताळणी सुरू होती, तेव्हा जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या मंजुरीपत्राबाबत संशय आला. सखोल तपासणी केली असता, हे पत्र पूर्णपणे बनावट असल्याचे आणि त्यावर वरिष्ठांच्या खोट्या सह्या असल्याचे उघड झाले. सरकारी यंत्रणेचा वापर करून असा बोगस कारभार केल्याचे समोर येताच विभागात एकच खळबळ उडाली.

बडे मासे गळाला लागणार?

या गंभीर प्रकरणाची दखल घेत समर्थ पोलिसांनी फसवणूक, सरकारी दस्तऐवजांमध्ये फेरफार आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात असून पोलीस निरीक्षक चेतन मोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Police have registered an FIR after forged signatures of senior Irrigation Department officials were allegedly used to secure approval for a bridge construction project.
Fraud Case : राजकारणात खळबळ! जिल्हाधिकाऱ्यांची बनावट सही करून मोठा घोटाळा, भाजपमधून हकालपट्टी झालेल्या बड्या नेत्याना अटक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com