Councillor Fraud Case : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट आदेश! कोटींच्या घोटाळ्यात मोठी कारवाई, भाजप नगरसेविकेच्या पतीला बेड्या; स्वत: आहे स्वीकृत नगरसेवक

Gadchiroli Fake Development Approval Order Case : गडचिरोलीमध्ये एक मोठी फसवणूक उघडकीस आली जिल्हाधिकाऱ्यांचे बनावट लेटरहेड आणि स्वाक्षऱ्यांचा वापर करण्यात आला आहे. याप्रकरणी भाजप नगरसेविकेच्या पतीला अटक करण्यात आली आहे.
Gadchiroli fake administrative approval scam; Ashish Pipre
Gadchiroli fake administrative approval scam; Ashish Pipresarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Crime News : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाचा आणि लेटरहेडचा गैरवापर करत 4 कोटी रुपयांच्या विकासकामांच्या बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार केल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत चामोर्शी नगरपंचायतीचा स्वीकृत नगरसेवक आशिष पिपरेला याला मध्यरात्री अटक केली आहे. पिपरेला याला रविवारी (ता.28) मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर येथून बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांची पत्नी भाजपची नगरसेवक आहे.

या कारवाईमुळे आता छत्रपती संभाजीनगरसह गडचिरोलीच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे भाजपमध्ये असताना पिपरे याने काँग्रेसच्या गटातून स्वीकृत नगरसेवक पद मिळविले होते. यामुळे त्याची तीन महिन्यांपूर्वी भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली होती. तर पत्नी भाजपची नगरसेविका आहे.

चामोर्शी नगरपंचायतीतील स्वीकृत नगरसेवक आशिष पिपरे याच्यावर तीन महिन्यांपूर्वी भाजपने हाकालपट्टीची कारवाई केली होती. भाजपमध्ये असतानाही त्याने काँग्रेसच्या गटातून स्वीकृत नगरसेवक पद मिळविले होते. तर याच्यावर अगरबत्ती प्रकल्पाच्या नावाखाली शेकडो महिलांची फसवणूक केल्याचाही आरोपही करण्यात आला आहे.

Gadchiroli fake administrative approval scam; Ashish Pipre
Crime News : धक्कादायक! सरपंचावर गोळीबाराचा प्रयत्न : पोलिसांनी 'तक्रार न घेता तासन् तास ताटकळत ठेवले'; सरपंचाच्या गंभीर आरोपानंतर...

​दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाचा आणि लेटरहेडचा गैरवापर करत 4 कोटी रुपयांच्या विकासकामांच्या बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार केल्या प्रकरणी पिपरे याला अटक करण्यात आली आहे. पिपरे याने जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट लेटरहेडवर त्यांची हुबेहूब स्वाक्षरी करून, जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF) निधीसाठी खोटी प्रशासकीय मान्यता मिळवली.

तर आशिष पिपरे याने एका माजी राज्यमंत्र्यांचा स्वीय सहाय्यक (पीए) म्हणूनही काम केल्याचे उघड झाले असून या राजकीय जवळीकचा फायदा घेत त्याने हा धक्कादायक प्रकार केला. तर पिपरेच्या अटकेनंतर या कटात आणखी काही व्यक्तींचा सहभाग उघड होण्याची शक्यता असून तपास यंत्रणा तपास करत आहेत.

Gadchiroli fake administrative approval scam; Ashish Pipre
Crime News : ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने घातला आदिवासींना गंडा; तब्बल 23 लाख उकळले

तसेच बनावट लेटरहेड, जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी, प्रशासकीय मंजुरी आदेशांची निर्मिती, त्यांचा वापर आणि त्यामागील आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास देखील केला जात आहे. तर या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदविले पिपरेच्या चौकशीतून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच तपासातून या प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com