

Loan Waiver : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुणे महसूल विभागातील पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील ९५ हजार ६०३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहेत, अशी माहिती सहकार विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमुक्ती योजनेच्या ऑनलाईन लाभ वितरणास शुक्रवारी (७ ऑगस्ट) सुरुवात करण्यात आली; यामध्ये कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर ३४५ कोटी २५ लाख ५ हजार ५९४ रुपये जमा करण्यात आले आहेत.
यात सातारा जिल्ह्यातील १९ हजार ५८ शेतकऱ्यांना १४२ कोटी ७ लाख ३९ हजार २८४ रुपये आणि सोलापूर जिल्ह्यातील ११ हजार ३९४ शेतकऱ्यांना १२८ कोटी १० लाख ४४ हजार १६१ रुपये याप्रमाणे ६९ हजार ४२२ शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण ६१५ कोटी रुपयाहून अधिक रक्कम कर्ज खात्यावर जमा करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील १ हजार ३५१, भोर २ हजार ३०८, मुळशी ५७६, मावळ १ हजार ३५२, खेड २ हजार २०८, शिरुर ४ हजार ७२९, आंबेगाव १ हजार ३५१, इंदापूर ९ हजार २३१ , वेल्हा ४१९, जुन्नर २ हजार १५५, बारामती ८ हजार ५७८, पुरदंर ३ हजार १४३ आणि दौंड १० हजार ६५३ तालुक्यात तसेच राष्ट्रीय व इतर बँकेमार्फत २ हजार ३९७ असे एकूण ५० हजार ४४८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण गुरुवारअखेर पूर्ण झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील ३ हजार १०७, पाटण १ हजार ८८६, महाबळेश्वर १९४ , जावळी ६९८, वाई ८४१, खंडाळा १ हजार ३७१, फलटण ४ हजार ४९३, माण ३ हजार ८०१, खटाव २ हजार ९५३, कोरेगांव ४ हजार १२४ आणि सातारा तालुक्यातील १ हजार ९५६ एकूण २५ हजार ४२४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण गुरुवारअखेर पूर्ण झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील ७५, दक्षिण सोलापूर १२५, पंढरपूर ५५८, सांगोला २७६, माळशिरस ५९८, बार्शी १६७, करमाळा ४५७, मोहोळ ३४२, माढा ३४८, अक्कलकोट ९३ आणि मंगळवेढा ७३७ तसेच राष्ट्रीय व इतर बॅकेमार्फत १५ हजार ९५५ एकूण १९ हजार ७३१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण कालअखेर पूर्ण झाले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जावून आपले आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे. आधार प्रमाणीकरण करुन घेतल्यानंतरच शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात रक्कम जमा होणार आहे तसेच नवीन पीक कर्ज घेण्यासही शेतकरी पात्र होणार आहेत, त्यामुळे आपले आधार प्रमाणीकरण करुन करुन घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.