FDA Action Pune : तुकाराम मुंडेंचा धसका? एका रात्रीत घोड नदीत बिस्किटांचा खच; शिरूरमधील 'त्या' प्रकाराने एकच खळबळ!

Expired Food Dumped in Ghod River : गेल्या काही दिवसांत पुणे शहर आणि जिल्ह्यात आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाने अतिशय कठोर पावले उचलली आहेत. नुकतेच पुण्यातून हजारो किलो भेसळयुक्त पनीर, खवा आणि दुग्धजन्य पदार्थांचा लाखो रुपयांचा साठा जप्त करण्यात आला होता.
FDA Action Pune | Expired Food Dumped in Ghod River
Expired biscuits, Maggi masala packets, and other food products seen floating near the Kolhapur-type weir on the Ghod River in Shirur following intensified FDA inspections.Sarkarnma
Published on
Updated on

Pune News, 22 Jun : राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त व धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर कारवायांचा धडाका लावला आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मोठ्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी एफडीएचा प्रचंड धस्का घेतला आहे.

याच संभाव्य कारवाईच्या भीतीने शिरूर शहरातील व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले असून, घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात कालबाह्य बिस्किटे, मॅगी मसाले आणि इतर खाद्यपदार्थ थेट नदीपात्रात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पुणे जिल्ह्यात 'एफडीए'चा कारवायांचा धडाका

गेल्या काही दिवसांत पुणे शहर आणि जिल्ह्यात आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाने अतिशय कठोर पावले उचलली आहेत. नुकतेच पुण्यातून हजारो किलो भेसळयुक्त पनीर, खवा आणि दुग्धजन्य पदार्थांचा लाखो रुपयांचा साठा जप्त करण्यात आला होता. तसेच पुरंदर तालुक्यात धडक मोहीम राबवून ५,७०० किलो सडलेले आंबे नष्ट करण्यात आले असून, मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त आंबा पल्प आणि आमरस जप्त करण्यात आला.

FDA Action Pune | Expired Food Dumped in Ghod River
MLC Election : विधानपरिषदेच्या निवडणुकीत अभयसिंह जगताप नडले अन् भिडलेही; आता विधानसभेला जयकुमार गोरेंची धाकधूक वाढली

इतकेच नव्हे तर वडगाव शेरी येथील एका नामांकित डेअरीचा आणि थेट 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या' मध्यवर्ती भोजनगृहाचा परवाना देखील स्वच्छतेच्या कारणावरून निलंबित करण्यात आला आहे.

शिरूर तालुक्यातील पाबळ येथेही प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करून एकाला अटक करण्यात आली आहे. या लागोपाठ सुरू असलेल्या धडक कारवायांमुळे जिल्ह्यातील नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

रात्रीच्या अंधाराचा घेतला फायदा

मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर शहरातील घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ शेकडो बिस्किटांचे बॉक्स आणि इतर अन्नपदार्थ पाण्यात तरंगताना नागरिकांना दिसले. पाण्यात फेकण्यात आलेली ही बिस्किटे, मॅगी आणि इतर खाद्यपदार्थ मुदत संपलेले म्हणजेच कालबाह्य झालेले होते.

FDA Action Pune | Expired Food Dumped in Ghod River
MLC Election Results : विधानपरिषदेत भाजपचा जलवा; बसवराज पाटील राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी

'एफडीए'च्या धाडीत जर हा माल सापडला असता, तर संबंधित व्यापाऱ्यावर मोठी दंडात्मक किंवा थेट कायदेशीर कारवाई झाली असती. जिल्ह्यातील कारवायांचे सत्र पाहता, याच कारवाईच्या भीतीने अज्ञात व्यापाऱ्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हा सर्व माल बंधाऱ्याच्या पाण्यात फेकून दिल्याचे बोलले जात आहे.

तुकाराम मुंडे यांच्या धाडसी मोहिमांमुळे अन्न सुरक्षेबाबत कडक वातावरण निर्माण झाले असले, तरी कारवाई टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी घेतलेली ही भूमिका नदीच्या पर्यावरणासाठी घातक ठरत आहे. या घटनेनंतर आता अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक प्रशासन या बेजबाबदार व्यापाऱ्याचा शोध घेऊन काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण शिरूर शहराचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com