Rambhau Moze: माजी आमदार रामभाऊ मोझे यांचं निधन; शरद पवारांचा खंदा समर्थक काळाच्या पडद्याआड

Rambhau Moze: पुण्यातील संगमवाडी येथील स्मशानभूमीत संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Rambhau Moze passed away
Rambhau Moze passed away
Published on
Updated on

Rambhau Moze Passed Away: काँग्रेसचे पुण्यातील माजी आमदार रामभाऊ मोझे यांचं सोमवारी निधन झालं. पुण्यातील जुन्या बोपोडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान होतं. प्रशालांसह इंजिनिअरिंग, फार्मसी अशा व्यवसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थाही त्यांनी उभारल्या. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. शरद पवारांचे ते कट्टर समर्थक म्हणूनही ओळखले जात होते. पुण्यातील संगमवाडी येथील स्मशानभूमीत संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Rambhau Moze passed away
Ram Mandir: राम मंदिर दानचोरी प्रकरणात महत्वाचे होणार खुलासे! सुप्रीम कोर्टाचे SITला आदेश, केंद्र-युपी सरकारला नोटीस

राजकीय कारकीर्द कशी होती?

रामभाऊ गेनबा मोझे हे पुणे जिल्ह्यातील एक वजनदार राजकीय नेते आणि माजी आमदार होते. १९८०-९०च्या दशकात राजकारणात त्यांचा सक्रीय वावर होता. जुन्या बोपोडी (Bopodi) विधानसभा मतदारसंघातून ते १९८०-८५-९० असे सलग तीन टर्म इंडियन काँग्रेसचे (सोशलिस्ट) आमदार म्हणून निवडून गेले होते. ते शरद पवारांचे खंदे समर्थक होते. पुणे शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर रामभाऊ मोझे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, पण पुन्हा २०१२ मध्ये ते स्वगृही अर्थात काँग्रेसमध्ये परतले होते.

पुण्यातील येरवडा, बालेवाडी, संगमवाडी परिसरातील स्थानिक राजकारणात आणि शिक्षण क्षेत्रातील रामभाऊ मोझे हे प्रसिद्ध होते. रामभाऊ मोझे यांच्यानंतर बोपोडी मतदारसंघाचं नेतृत्व काँग्रेसचे नेते चंद्रकांत छाजेड यांनी केलं.

शैक्षणिक क्षेत्रात मोठं योगदान

रामभाऊ मोझे यांचं शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान आहे. ते गेनबा सोपानराव मोझे ट्रस्टचे (Genba Sopanrao Moze Trust) संस्थापक होते. या ट्रस्टच्या माध्यमातून पुण्यात शाळा, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि इतर शैक्षणिक संस्था चालवल्या आहेत. येरवडा परिसर, बालेवाडी, वाघोली इ. विविध ठिकाणी या संस्था कार्यरत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com