२९ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला अन् गजानन चिंचवडेंचे जीवन संपले?

गजानन चिंचवडे यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.
Gajanan Chinchwade
Gajanan Chinchwadesarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) नेते व पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे (ShivSena) पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचे शनिवारी (ता.५) ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यानंतर लगेचच त्यांच्या मृत्यूवरून आता राजकारण सुरु झाले आहे. राज्यातील सत्ताधारी पक्ष हा त्यांचा मारेकरी असल्याचा आरोप भाजपचे (BJP) माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे यांनी आज केला. तर, चिंचवडेंचा राजकीय छळ केला गेला. त्यांचे मानसिक स्वास्थ बिघडवण्यात आले, असे महापौर माई ऊर्फ उषा ढोरे म्हणाल्या.

पिंपरी-चिंचवड ही छळछावणी झाली असून आगामी पालिका निवडणूक होईपर्यंत आणखी काही भाजप कार्यकर्त्यांवर या छळछावणीत अत्याचार होतील, अशी भीती साबळे यांनी व्यक्त केली. मात्र, राज्य सरकारच्या या पाशवी भुमिकेला चोख उत्तर देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. चिंचवडे यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २९ वर्षापूर्वीची त्यांची जुनी केस उकरून काढीत आता २५ जानेवारीला त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Gajanan Chinchwade
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

त्यामुळे त्यातूनच त्यांचे निधन झाले, असा दावा साबळेंनी केला. त्यांच्यासह महापौर तसेच भाजपचे पालिकेतील सभागृहनेते नामदेव ढाके यांनी पालिकेच्या पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्म़ृती रुग्णालय आवारात जमून राज्य सरकारचा निषेध केला. भाजपला बदनाम करण्याचे षडयंत्रच आखले गेले असून त्याअंतर्गत राज्यभर आमच्या कार्यकर्त्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यासाठी पिंपरी-चिंचवड, तर छळछावणी करण्यात आली असल्याचा आरोप साबळे यांनी केला.

Gajanan Chinchwade
कोरोना रुग्ण घटले; मात्र, मृत्यूच्या आकडेवारीने वाढवली चिंता

शहर छळछावणी केल्याची उदाहरणे देताना त्यांनी पक्षाचे माजी उपमहापौर व नगरसेवक केशव घोळवे यांनी खंडणी व फसवणुकीच्या गुन्ह्यात नुकतीच अटक झाली. त्यापूर्वी स्थायी समितीचे सभापती तथा अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांनाही अशाच खोट्या गुन्ह्यात गेल्यावर्षी गोवण्यात आल्याचे सांगितले. तर, आता चिंचवडेचा बळीच घेतला, असे ते म्हणाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्रास दिल्याने चिंचवडे हे मोठ्या ताणतणावात होते, असे त्यांच्या एका नातेवाईकाने यावेळी सांगितले. राजकीय छळ करणे चूक असल्याचे महापौरांनी सांगितले. चिंचवडेंचे मानसिक स्वास्थ बिघडवून त्यांचा छळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे केली. दरम्यान, फसवणुकीच्या गुन्ह्यात चिंचवडेंसह त्यांची भाजपची नगरसेविका पत्नी अश्विनी चिंचवडे यांना कालच (ता.४) मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com