पिकाच्या पंचनाम्यावरून माजी सरपंचाची विद्यमान सरपंचांना मारहाण

पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याबाबतचे मेसेज व्हॉट्स ॲप ग्रुपवर का टाकला नाही, असे जाब विचारत शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली.
Shirur Crime News
Shirur Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

पुणे : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी अद्याप सावरला नाही. त्यातच काही जिल्ह्यांत सरकारकडून मदत मिळाली आहे, तर काही जिल्ह्यात मदतीचा पत्ताच नाही. मात्र, पंचनामे आणि भरपाईवरून शेतकरी आता हातघाईला आलेला दिसत आहे. काही ठिकाणी मारहाणीचे प्रकार घडत आहेत. असाच प्रकार पुणे (pune) जिल्ह्याच्या शिरूर (shirur) तालुक्यातील खैरेनगर येथे घडला आहे. पीक पंचनाम्यावरून माजी सरपंचाने (Sarpanch) विद्यमान सरपंचांना मारहाण केली आहे. या प्रकरणी माजी सरपंचावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Former sarpanch beat up current sarpanch over panchanama of crop)

शिरूर तालुक्यातील पाबळ मंडलात १५ दिवसांपूर्वी एका रात्रीत, एका तासात तब्बल १४७ मिलीमिटर पाऊस पडला आहे, त्यामुळे या भागातील संपूर्ण शेती पाण्याखाली गेली होती. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे काम सुरू झाले. मात्र, खैरेनगरचे माजी सरपंच एकनाथ सदाशिव खैरे हे याच कारणामुळे ग्रामपंचायतीत गेले होते.

Shirur Crime News
कोल्हापुरात ऊसदर आंदोलन चिघळले : शिरोळ बंद पुकारणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

ग्रामपंचायत कार्यालयात गेल्यानंतर विद्यमान सरपंच संदीप ज्ञानोबा खैरे यांच्यावर त्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याबाबतचे मेसेज व्हॉट्स ॲप ग्रुपवर का टाकला नाही, असे जाब विचारत शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली. एकाच दिवशी प्रचंड पाऊस पडणे आणि त्यातून हमरीतुमरीचे प्रकार घडत असल्याचे यावरून दिसून येत आहे.

Shirur Crime News
सोलापूर शिवसेनेतील पडझड थांबेना : अक्कलकोट तालुकाप्रमुख, शहरप्रमुखांसह आणखी १५ जणांचे राजीनामे

दरम्यान, सरपंच संदीप खैरे यांनी पाबळ पोलिस चौकीत लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यावरून माजी सरपंच एकनाथ खैरे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा तपास शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार व्ही. एन. चौधर करीत आहेत.

Shirur Crime News
‘अब्दुल सत्तार जिथे जातात तिथे गमती करतात; ते कृषीमंत्री नसून स्वखुशीमंत्री’

अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने या भागातील शेतकरी हवालदील झाले आहेत. शासनाकडून तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, यासाठी राजकीय नेते-पदाधिकाऱ्यांवरही प्रचंड दबाव वाढत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com