Pune Political Leaders FIR: पुण्यात 'मविआ'सह सत्ताधारी महायुतीची 'दादागिरी' सुसाट; 2 दिवसांत 4 राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल

Pune City Crime News : एकीकडे गुन्हेगारी वाढत असल्या बाबत राजकीय नेते ओरड करत असतानाच त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी आणि नेत्यांचा गुन्हेगारी कारवाईंमध्ये सहभाग नोंदवला जात असल्याने हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनला आहे.
Pune City Crime
Pune City CrimeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असल्याची ओरड सातत्याने राजकीय पक्ष्यांच्या नेत्यांकडून करण्यात येत असताना पाहायला मिळते. मात्र, पुण्यातील (Pune) वाढत्या गुन्हेगारी कारवायांमध्ये राजकीय व्यक्तींचा सहभाग वाढलाय का? असा प्रश्न उपस्थित करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेले दोन दिवसांचा विचार केल्यास पुणे शहरामध्ये काँग्रेस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना आणि मनसेच्या निगडित असलेल्या राजकीय व्यक्तींवर पुणे शहरातील विविध भागांमध्ये गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

पहिल्या घटनेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेले कोंढवा परिसरात माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांच्या जावई जावेद पठाण यांच्या सह टोळक्यांने रस्त्यावर हैदोस मांडल्याची घटना समोर आली . किरकोळ बाचाबाचीवरून सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज शेख यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली.

तसेच हातात कोयते घेऊन जावेद पठाण आणि त्याच्या साथीदारांनी रात्री साडेअकरा सुमारास दहशतीचं वातावरण निर्माण केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

Pune City Crime
Pune Municipal Clash : पुणे महापालिकेत मनसेला महाविकास आघाडीची साथ! प्रभाग रचनेवरून नवा वाद

तसेच राज्यांमध्ये सत्तेत असलेले दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुण्यातील पदाधिकारी अजय भोसले यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. 31 जुलै रोजी अजय भोसले आणि त्यांच्या समर्थकांनी बेकायदेशीररीत्या जमाव जमवून रुबी हॉस्पिटलसमोर गोंधळ घातला. जमावाने हॉस्पिटलच्या व्यवस्थापनातील संबंधित व्यक्तींवर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फेकून मारल्या. संबंधित व्यवस्थापक अधिकाऱ्याच्या अंगावर धाव घेत त्यांचे जॅकेट ओढून धक्काबुक्की केल्याबाबतचा गुन्हा कोरेगाव पार्क पोलीस चौकीमध्ये दाखल करण्यात आली आहे.

तिसऱ्या घटनेमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते असलेल्या गोपाल तिवारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील नारायण पेठ परिसरात रस्त्यावर फलक लावण्याच्या वादातून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत काँग्रेस नेते गोपाल तिवारी यांच्यासह सहा जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात गोपाल तिवारी यांचा सहभाग आढळून आल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Pune City Crime
Jalgaon BJP Politics: उमेदवारीसाठी भाजपकडे प्रस्थापितांची कसोटी, आरक्षण बिघडवणार अनेकांची गणिते?

तर चौथ्या प्रकरणात महापालिका आयुक्तांची बैठक सुरु असताना तिथे शिरकाव करत गोंधळ घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मनसे नेते किशोर शिंदे, प्रशांत मते, नरेंद्र तांबोळी, अविनाश जाधव, महेश लाड व इतर 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

एकीकडे गुन्हेगारी वाढत असल्या बाबत राजकीय नेते ओरड करत असतानाच त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी आणि नेत्यांचा गुन्हेगारी कारवाईंमध्ये सहभाग नोंदवला जात असल्याने हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com