Pune Municipal Clash : पुणे महापालिकेत मनसेला महाविकास आघाडीची साथ! प्रभाग रचनेवरून नवा वाद

Political Controversy Over Pune Ward Delimitation : पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना सध्या तयार करण्यात येत आहे. मात्र ही प्रभाग रचना करण्याचे काम सुरू असताना प्रशासनाकडून सत्ताधारी भाजपच्या फायद्याची प्रभाग रचना बनवण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
Pune Municipal Commissioner Nawal Kishore Ram
Pune Municipal Commissioner Nawal Kishore Ram in a heated exchange with MNS leader Kishor Shinde over ward delimitation. The controversy has sparked political backlashSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 07 Aug : पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते किशोर शिंदे यांच्यात बुधवारी (ता.06) महापालिकेमध्ये मोठा वाद झाला. या वादानंतर महापालिका आयुक्तांनी, किशोर शिंदे जेव्हा बैठकीच्या ठिकाणी आले तेव्हा त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा निवेदनाचा कागद नव्हता.

ते जाणीवपूर्वक माझ्याशी वाद घालण्यासाठी आले होते आणि हे सर्व प्री प्लॅन असल्याचं सांगितलं. आयुक्तांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि इतर विरोधी पक्षातील स्थानिक पदाधिकारी आणि नेते महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या विरोधात आक्रमक असल्याचं पाहायला मिळत आहे.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना सध्या तयार करण्यात येत आहे. मात्र ही प्रभाग रचना करण्याचे काम सुरू असताना प्रशासनाकडून सत्ताधारी भाजपच्या फायद्याची प्रभाग रचना बनवण्यात येत असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे.

Pune Municipal Commissioner Nawal Kishore Ram
NCP Sharad Pawar Politics: महाविकास आघाडीत सध्या तरी बिघाडी, राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांची कबुली!

भाजपचे काही नेते प्रशासनासोबत बसून आपल्या सोयीप्रमाणे ही प्रभाग रचना बनवत असल्याचं आरोप आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून या प्रभाग रचनेबाबत बोलण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते सातत्याने महापालिका आयुक्तांकडे वेळ मागत होते.

मात्र, महापालिका आयुक्त वेळ देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी केला होता. प्रभाग रचना जोपर्यंत महापालिका प्रशासनाकडे होती. तोपर्यंत महाविकास आघाडीच्या नेत्यांना आयुक्तांनी भेटण्याची वेळ दिली नाही. प्रभाग रचना राज्य शासनाला सादर केल्यानंतर महापालिका आयुक्त आघाडीच्या नेत्यांना भेटले.

Pune Municipal Commissioner Nawal Kishore Ram
Dhananjay Munde Met Ajit Pawar : अजित पवारांसमोर धनंजय मुंडेंचे प्रेझेंटेशन; परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी वाढीव 83 कोटी!

त्यामुळे प्रभाग रचनेबाबत आयुक्तांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप सातत्याने आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. प्रभाग रचनेच्या प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाचा वाढता हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. महापालिका प्रशासनाने याबाबत वेळीच सुधारणा न केल्यास महाविकास आघाडीकडून प्रभाग रचनेला न्यायालयात आव्हान दिले जाईल, असा इशारा आघाडीच्या नेत्यांनी आयुक्त नवल किशोर राम यांना दिला होता.

त्यानंतर आयुक्त आणि किशोर शिंदे या वादाच्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीचे नेते एकवटले असून आयुक्तांच्या कृतीचा निषेध करत आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींना प्रभाग रचनेची किनार आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच राज्यात मनसेकडून मराठीचा मुद्दा गाजत असताना पुण्यात मात्र हा मुद्दा तितका चर्चेत आलेला नाही. त्यामुळे या निमित्ताने नवा मुद्दा चर्चेत आणला जातोय का? अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com