Gaja Marne Meet Parth Pawar : पार्थ पवार-गजा मारणे भेटीवर जयंत पाटलांचे हाताची घडी तोंडावर बोट

Jayant Patil : संदीप मोहोळच्या हत्येनंतर टोळी युद्ध भडकण्याचा धोका आहे.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Pune : कुख्यात गुंड गजा मारणे याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीचे फोटो देखील समोर आले. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या भेटीवर टीका केली जात असताना राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जयंत पाटील यांनी मात्र हाताची घडी तोंडावर बोट, हे धोरण स्वीकारल्याचे दिसून आले. या भेटीवर काहीही बोलण्यास पाटील यांनी नकार दिला.

Jayant Patil
Breaking News : जरांगे-पाटील कोणती भूमिका घेणार? दुपारी 2 वाजता पुन्हा जाहीर सभा

जयंत पाटील (Jayant Patil ) यांना पार्थ पवार आणि गजा मारणे ‌भेटीवर विचारण्यात आले तेव्हा 'यावर मला काही जास्त माहिती‌ नाही. त्यामुळे मी यावर बोलणार नाही', असे सांगत या विषयावर काहीही भाष्य करण्यास स्पष्ट नकार दिला. पुण्यात संदीप मोहोळच्या हत्येनंतर टोळी युद्ध भडकण्याचा धोका आहे. अशा स्थितीत कुख्यात गुंड पार्थ पवार (Parth Pawar) यांची भेट घेत असेल तर त्यावर बोलण्याचे राजकीय नेते टाळत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. Gaja Marne Meet Parth Pawar

पार्थ पवार यांची कुख्यात गुंड गजा मारणे यांनी सपत्नीक भेट घेतलीत्यावेळी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष दीपक मानकर, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रदीप देशमुख हे पदाधिकारी देखील उपस्थित होते. गजा मारणेवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याची पत्नी मनसेची नगरसेविका होती. आता ती राष्ट्रवादीमध्ये आहे. त्यामुळे पत्नी पाठोपाठ गजा मारणे देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चा आहे.

विरोधकांनी संधी सोडली

गजा मारणेवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी तो एका खंडणी प्रकरणात फरार होता. त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी,मारामारी असा स्वरुपाचे 23 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. पुण्यात वाढलेल्या गुंडगिरीवरून अजित पवार यांनी अनेकदा पोलिसांना फैलावर घेतले आहे.त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे पुत्रालाच कुख्यात गुंड भेटत असेल तर त्यावरून अजित पवार यांना विरोधीपक्ष टार्गेट करेल, अशी शक्यता होत. मात्र, जयंत पाटील यांनी थेट आपल्याला काहीच माहीत नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com