Gaurakshak: भाजपा आमदार महेश लांडगे भडकले! थेट अजित पवारांनाच दिलं आव्हान; म्हणाले, गोरक्षण म्हणजे...

Gaurakshak: गोरक्षकांवरील कारवाई आम्ही खपवून घेणार नाही, अशी भूमिका या आमदरानं मांडली आहे.
Mahesh Landage_Ajit Pawar
Mahesh Landage_Ajit Pawar
Published on
Updated on

Pune News Gaurakshak: गोरक्षक धर्माचे रक्षण करत आहेत, गोमातेच्या संवर्धनासाठी काम करीत आहेत. गोरक्षकांवर खोटे केस करण्याचा प्रयत्न कुणी केला तर आम्ही कदापी सहन करणार नाही. गोरक्षण करणे म्हणजे चिंचोका खेळणं नाही. चुकीच्या पद्धतीने काही लोक प्रशासनासमोर गोरक्षकांबाबत मांडणी करत आहेत. त्यांनी एकदा गोवंश कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या गाडीचा पाठलाग करावा, म्हणजे गोरक्षण काय आहे? हे तुम्हाला समजेल, अशी भूमिका भाजपा आमदार महेश लांडगे यांनी मांडली.

इंदापूर येथे मालोजीराजे भोसले यांची गढी आणि समाधीजवळील अतिक्रमण हटवण्याबाबत सकल हिंदू समाजाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे सुनावले आहे.

Mahesh Landage_Ajit Pawar
Anjali Damania: कबूतरखाना वादात अंजली दमानियांची एन्ट्री; केली 'ही' मोठी मागणी

तीन दिवसांपूर्वी कुरेशी समाजातील प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि गोरक्षकांच्या त्रासाबद्दल तक्रार केली. त्यानंतर अजित पवारांनी ‘‘गोरक्षकांना आवर घाला’’ अशा सूचना पोलिस प्रशासनाला केल्या. त्यामुळे हिंदुत्ववादी संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजाची सूर आहे.

Mahesh Landage_Ajit Pawar
DGIPR : देशभक्त दोन प्रकारचे असतात, तुम्ही कोणत्या प्रकारात येता?; असा प्रश्न विचारणारी सरकारी प्रचार यंत्रणा झाली ट्रोल

हिंदुत्ववादी सरकार असतानाही गोरक्षकांवर बंदी घालण्याची भूमिका घेतली जात आहे, अशी खंत गोरक्षकांमधून व्यक्त होत होती. दरम्यान, इंदापूरच्या मोर्चामध्ये आमदार लांडगे यांनी ‘‘गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे..’’ असे वक्तव्य केल्यामुळे गोसंवर्धन आणि गोरक्षकांच्या मुद्यावरुन अजित पवारांनी विरोधात थेट भाजपचे नेते मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहेत.

Mahesh Landage_Ajit Pawar
Pratap Sarnaik News: 'रक्षाबंधन'मुळे एसटी महामंडळाचं नशीब फळफळलं; 4 दिवसांतच भाऊ-बहिणींनी टाकली कोट्यवधींची ओवाळणी

लांडगे पुढे म्हणाले, "एखादा जिहादी जातो आणि अजित पवारांना सांगतो की गोरक्षक आमचे नुकसान करतात. त्यांना काय अडचण आहे? जुन्नरमधील बेकायदेशीर कत्तलखाने आम्ही बंद केले आहेत. गोमातेचे आम्ही रक्षण करणार आहोत. गोरक्षकांवर बंदी घालण्याची भाषा कोणी करु नये. 'गोरक्षण', 'लव्ह जिहाद', 'लॅन्ड जिहाद', 'धर्मांतर' खपवून घेणार नाही. राज्यात भाजपा महायुतीचं हिंदुत्ववादी सरकार आहे, त्यामुळं गोरक्षकांनी घाबरण्याचे कारण नाही"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com