PM Modi : Girish Bapat यांच्या सोबतचा विमानतळावरील फोटो मोदींनी केला ट्विट...

Girish Bapat Death News : राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याच्या भावना राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
PM Narendra Modi On Girish Bapat
PM Narendra Modi On Girish BapatSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे प्रदीर्घ आजाराने आज (बुधवारी) निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या जाण्यानं राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याच्या भावना राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

PM Narendra Modi On Girish Bapat
Girish Bapat News : ''महाराष्ट्रातील सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे...''; शरद पवारांकडूनही बापटांच्या निधनावर शोक व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करुन खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे. गिरीश बापट हे एक नम्र आणि कष्टाळू नेते होते, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्यांनी गिरीश बापट यांच्यासोबतचा विमानतळावरील फोटोही शेअर केला आहे.

''गिरीश बापट हे एक नम्र आणि कष्टाळू नेते होते. गिरीश बापट यांनी समाजाची तळमळीने सेवा केली. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात काम केले. विशेषत: पुण्याच्या विकासासाठी ते प्रयत्नशील होते. त्यांचे निधन दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या संवेदना.ओम शांती'', अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्विट करुन खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ''पुण्याचे खासदार व भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनाने भाजपची कधीही भरून न येणारी हानी झाली. बापटजी शेवटच्या श्वासापर्यंत देश व संघटनेच्या हितासाठी समर्पित राहिले. या दु:खाच्या प्रसंगी संपूर्ण संघटन त्यांच्या कुटुंबासोबत उभ आहे. दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो. ॐ शांति, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.