Gopichand Padalkar Vs Ajit Pawar : लक्ष्मण हाकेंच्या समर्थनासाठी गोपीचंद पडळकर मैदानात! थेट अजित पवारांना दिला सल्ला, 'बैठक घ्या अन्...'

OBC Politics Laxman Hake Gopichand Padalkar : अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांकडून हाके यांचावर होणाऱ्या टीकेबाबत बोलताना पडळकर म्हणाले, कोणी जर प्रश्न विचारत असेल तर त्याला तुम्ही उत्तर द्या.
Gopichand Padalkar  Laxman Hake Ajit Pawar
Gopichand Padalkar Laxman Hake Ajit Pawar sarkarnama
Published on
Updated on

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसी तसेच सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवला असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. तसेच अजित पवार हे नेहमीच भाजपाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या इशाऱ्यावर चालतात. आम्हाला निधी देताना अजित पवार यांच्या हाताला लकवा मारतो का? असा खोचक सवाल देखील लक्ष्मण हाके यांनी केला होता. या वक्तव्याचा अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी देखील चांगला समाचार घेतला.

सध्या सुरू असलेल्या अजित पवार यांच्या पक्षातील नेते आणि लक्ष्मण हाके यांच्यामधील आरोप प्रत्यारोपामध्ये आता भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी उडी घेतली आहे. लक्ष्मण हाके जे आरोप करत आहेत त्यावर अजित पवारांनी खुलासा करणं आवश्यक असल्याचा देखील पडळकर म्हणाले आहेत.

पडळकर म्हणाले, लक्ष्मण हाके ज्या गोष्टी बोलत आहेत त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने बैठक घेणे आवश्यक आहे. या बैठकीला सर्व ओबीसी नेत्यांना बोलवावे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या बैठकीला उपस्थित राहतील. या बैठकीतील सगळा खुलासा होईल जर निधी अडवला असेल तर तो खुला करण्यात येईल तसेच जर निधी अडवला नसेल तर तसे त्या बैठकीमध्ये अजित पवार सांगू देखील शकतील, असे पडळकर म्हणाले.

Gopichand Padalkar  Laxman Hake Ajit Pawar
Shivsena Unite : मोठी बातमी! कट्टर विरोधक एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंचे शिलेदार एकत्र, हिंदुत्वच्या मुद्यावर...

अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांकडून हाके यांचावर होणाऱ्या टिकेबाबत बोलताना पडळकर म्हणाले, 'कोणी जर प्रश्न विचारत असेल तर त्याला तुम्ही उत्तर द्या. माझ्यावर कोणी आरोप केला तर त्याला मी पुराव्यानिशी उत्तर दिले पाहिजे. जर ओबीसींचे पैसे अडवले नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मत असेल तर त्यांनी त्या पद्धतीचा क्लिअरिफिकेशन देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात जर याबाबत शंका असेल तर त्या संख्येचा निरसन करणे त्या खात्याची जबाबदारी आहे.'

Gopichand Padalkar  Laxman Hake Ajit Pawar
Shrirampur police encroachment : अतिक्रमण केलेल्या पोलिस मदत केंद्रावर जलसंपदाचा 'बुलडोजर' फिरणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com