Vasantdada Sugar Institute Sabha : ९०० हार्वेस्टर घेण्यासाठी सरकार मदत करणार ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

उसापासून साखरेसोबत इथेनॉल निर्मिती देखील राज्यातील साखर उद्योगांनी सुरू केली असून १०६ साखर कारखाने इथेनॉल निर्मिती करत आहेत.
Vasantdada Sugar Institute Sabha
Vasantdada Sugar Institute SabhaSarkarnama
Published on
Updated on

पुणे : ऊस तोडणी क्षेत्रात मजुरांची टंचाई आहे. ती समस्या दूर करण्यासाठी ९०० हार्वेस्टर घेण्यासाठी सरकार मदत करेल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सभेत बोलताना केले. (Government will help to get 900 harvesters : CM Eknath Shinde's announcement)

पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळा आज पार पडला. साखर उत्पादनात वेगळे प्रयोग करून विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना या प्रसंगी सन्मानित करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा केली.

Vasantdada Sugar Institute Sabha
Eknath Shinde : ‘जयंतराव, आज समोर नाहीत, त्यामुळे मजा नाही...’ : मुख्यमंत्र्यांनी घेतली जयंत पाटलांची फिरकी

शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या या संस्थेत ऊस पिकाचे उत्पादन वाढून त्याचे लागवड क्षेत्र वाढावे, या साठी विशेष प्रयत्न केले जातात. या संस्थेची प्रतिष्ठा कायम ठेवण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे.

Vasantdada Sugar Institute Sabha
Jalgaon Dudh Sangh : आमदार मंगेश चव्हाणांचा खडसेंना पुन्हा दणका : जळगाव दूध संघातील बहुचर्चित नोकरभरती रद्द

कोरोना काळात साखर कारखान्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. कोविड सेंटर करिता जागा उपलब्ध करून देत सॅनिटायझर निर्मितीसाठी देखील त्यांनी पुढाकार घेतला. सांगली-कोल्हापूर येथील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुराच्या वेळी पूरग्रस्तांना मदत केली, हे निश्चितच कौतुकास्पद होते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून कृषी विज्ञान तंत्रज्ञान, ऊस लागवड, जमिनीची सुपीकता, नवीन वाणांची निर्मिती यासाठी काम केले जात आहे. हा उद्योग वाढावा आणि टिकावा यासाठी शासन देखील नक्कीच प्रयत्न करेल अशी ग्वाही याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना दिली.

Vasantdada Sugar Institute Sabha
Pune Police News : राजकीय नेत्यांमार्फत फिल्डिंग लावली; तरीही बदली नाही झाली : काहींची धावपळ वाया

देशातील कृषी प्रक्रिया उद्योगात राज्यातील ऊस उत्पादनाचा क्रमांक वरचा आहे, त्यामुळे जगात देखील महाराष्ट्र साखर उत्पादनात अग्रेसर आहे. मात्र काळाची गरज म्हणून आता उसापासून साखरेसोबत इथेनॉल निर्मिती देखील राज्यातील साखर उद्योगांनी सुरू केली असून १०६ साखर कारखाने इथेनॉल निर्मिती करत आहेत. भविष्यात ही संख्या अधिक वाढेल, अशी अपेक्षाही या वेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

Vasantdada Sugar Institute Sabha
Nashik Graduate Constituency Election : खडसे अॅक्शन मोडवर : नाशिक पदवीधरची गणितं बदलणार?

शिंदे म्हणाले की, राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यात १८ सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात आले असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत हे अधोरेखित करत एनडीआरएफचे निकष बदलून मदत करणे तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला असल्याचे नमूद केले. जलयुक्त शिवार योजना राबविण्यासाठी शासन पुढाकार घेणार असून राज्यातील शेतकऱ्यांना ९०० हार्वेस्टर घेण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल.

या वेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार, उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे विश्वस्त व विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री आणि विश्वस्त जयंत पाटील, संचालक मंडळाचे सदस्य हर्षवर्धन पाटील, विश्वजित कदम, बाळासाहेब पाटील, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर, सतेज पाटील, दिलीप देशमुख, विशाल पाटील आणि साखर महासंघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांच्यासह संचालक मंडळातील सर्व सदस्य पदाधिकारी तसेच पुरस्कारप्राप्त शेतकरी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com