पुणे : पुणे शहर, पिंपरी व जिल्ह्यात मंगळवारी नवीन कोरोना रुग्णांच्या तुलनेत दीडपट्टीहून अधिकजण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात दिवसांत एकूण २१९ नवे रुग्ण आढळून आले तर ३४६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात जिल्ह्यात केवळ दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील ६१ रुग्ण आहेत.
दिवसभरात जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील सर्वाधिक १७० जण कोरोनामुक्त झाले आहे. मृत्यूमध्ये पुणे शहर व जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एक मृत्यू आहे. मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यातील चौदा नगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि तीनही कटक मंडळांमध्ये (कॅंटोन्मेंट बोर्ड) एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने दररोजच्या क्षेत्रनिहाय कोरोना रुग्णांची स्थिती दर्शविणारा अहवाल प्रसिद्ध केला जातो. या अहवालात क्षेत्रनिहाय दिवसातील नवीन कोरोना रुग्ण, कोरोनावर मात केलेले रुग्ण, कोरोनामुळे झालेले मृत्यू आणि घेण्यात आलेल्या चाचण्या आदींबाबतची माहिती दिली जाते.
मंगळवारी दिवसभरात पुणे शहरातील ६१ नवीन रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये ५७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ८६, नगरपालिका हद्दीत ११ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ४ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुक्तांमध्ये शहरातील ८२, पिंपरी चिंचवडमधील ७६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १७०, नगरपालिका १५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील तीन जण आहेत
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.