Sharad Pawar-Ajit Pawar : ‘साहेब-दादा एकत्र आले तर आनंदच; पण काही महत्वकांक्षी नेते तसे होऊ देणार नाहीत...’

NCP News : अजितदादा आणि पवारसाहेब एकत्र आले, तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मनापासून आनंद होईल. राजकारणात जे काही होईल ते होईल. पण माझ्यासारखा कार्यकर्ता अजितदादांना कधीही सोडणार नाही.
Sharad Pawar-Ajit Pawar-Atul Benke-Sunil Shelke
Sharad Pawar-Ajit Pawar-Atul Benke-Sunil ShelkeSarkarnama
Published on
Updated on

Pune, 20 July : महाराष्ट्राच्या हितासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे भविष्यात एकत्र आले तर आम्हाला मनापासून आनंद होईल. ज्यांना स्वतःचं हित साध्य करायचं आहे, असे महत्वकांक्षी नेते ते होऊ देणार नाहीत, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) हे जुन्नरच्या दौऱ्यावर होते. त्या वेळी आमदार बेनके (Atul Benke) यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगाव येथील घरी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना यदाकदाचित विधानसभा निवडणुकीपूर्वी साहेब आणि दादा एकत्रही येऊ शकतात, असे विधान केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

आमदार शेळके म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. जुन्नरचे लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार अतुल बेनके हे पवार यांचे स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. पण, बेनके आणि पवार यांच्यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही.

महाराष्ट्राच्या हितासाठी भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ होत असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नक्कीच त्याचा आनंद असेल. पण, काही महत्वकांक्षी मंडळींना स्वतःचं हित साध्य करायचं आहे. त्यांना महाराष्ट्रात लवकर नेते व्हायचं आहे, अशा मंडळी साहेब आणि दादांना किंवा ज्यांनी मागील ३५ ते ४० वर्षे साहेबांना साथ दिली, अशा नेतेमंडळींना एकत्र येऊ देणार नाहीत, हेदेखील आम्हाला ज्ञात आहे, असेही आमदार शेळके यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar-Ajit Pawar-Atul Benke-Sunil Shelke
Shrijaya Chavan : अशोक चव्हाणांसाठी मुलीचे राजकारणातील लाँचिंग सोपे नाही...

सुनील शेळके म्हणाले, ज्या लोकांना महत्वकांक्षा आहे. जे अजितदादांवर टीका टिप्पणी करतात. दादांचं पक्ष उभारणीतील आणि महाराष्ट्राच्या विकासात जे योगदान आहे. हे कुठेतरी झाकून आम्हीच पक्ष मोठा केला आहे. आम्ही पवारसाहेबांचे खरे वारसदार आहोत, असे दाखवण्याचं काम सुरू केलं आहे. त्या मंडळींना साहेबांसोबत दादांना किंवा ज्या मंडळींनी साहेबांसोबत काम केलं आहे. त्यांना एकत्र येऊ द्यायचं नाही.

अजितदादा आणि पवारसाहेब एकत्र आले, तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मनापासून आनंद होईल. राजकारणात जे काही होईल ते होईल. पण माझ्यासारखा कार्यकर्ता अजितदादांना कधीही सोडणार नाही. अजितदादांची साथ अविरतपणे ठेवून त्यांच्यासोबत खंबीरपणं उभं राहायचं, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar-Ajit Pawar-Atul Benke-Sunil Shelke
NCP NEWS : विधानसभा निवडणुकीपूर्वी दादा अन्‌ साहेब एकत्र येऊ शकतात; राष्ट्रवादीच्या नेत्याचे मोठे विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com