Pune Rave Party: 'पुणे रेव्ह पार्टी'त मोठा ट्विस्ट; प्रांजल खेवलकरांवर नवे धक्कादायक आरोप; परप्रांतीय मुली, 28 वेळा हॉटेलचं बुकिंग...

Pranjal Khewalkar News : पुण्यातील रेव्ह पार्टीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आल्यामुळे हे प्रकरण राज्याचं आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण तापलं आहे.
Pune Rave Party .jpg
Pune Rave Party .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील खराडी येथील सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी छापा टाकून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी खेवलकर यांच्या फोनमधील आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅटची माहिती सादर केली होती. आता पुणे रेव्ह पार्टीत (Pune Rave Party) मोठा ट्विस्ट आला आहे. आता खेवलकर यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यातील रेव्ह पार्टीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आल्यामुळे हे प्रकरण राज्याचं आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण तापलं आहे. सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेनं राज्य महिला आयोगाकडे खेवलकर यांच्याविषयी गंभीर तक्रार केली आहे.

राज्य महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीत सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेनं प्रांजल खेवलकर यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. यात प्रांजल खेवलकर यांनी परप्रांतीय मुलींना बोलावल्यासह 28 वेळा स्वत:च्या नावानं हॉटेल बुक केल्याचाही आरोप केला आहे.या आरोपांनंतर आता महिला आयोगानं मोठे निर्देश दिले आहेत.

महिला आयोगानं पुणे पोलिसांना पत्र पाठवून मानवी तस्करींविषयी केलेल्या आरोपींची चौकशी आणि कारवाईचे निर्देश दिले आहेत. पुणे पोलिसांनी केलेल्या छापेमारीत या रेव्ह पार्टीच्या ठिकाणी टेबलवर सिगारेटच्या पाकिटात अमली पदार्थ,दारूच्या बॉटल्स आढळल्या असल्याची माहिती समोर आली होती.

Pune Rave Party .jpg
Eknath Shinde: फडणवीस अन् अजितदादांची शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातच मोठी खेळी? शिंदे अस्वस्थ,आठवड्यात दुसरा दिल्ली दौरा

याचदरम्यान, पुणे पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांच्या फोनमधून आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट आढळल्याचंही माहिती दिली होती. त्यात पोलिसांनी एका मुलीचा व्हिडिओ दुसऱ्या आरोपीला पाठवत ऐसा माल चाहिए असा संदेश पाठवल्याचेही सांगितले.

आमदार एकनाथ खडसे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जर ती खरी रेव्ह पार्टी असेल आणि त्या रेव्ह पार्टीत आमचे जावई गुन्हेगार असतील तर मी त्याचं समर्थन करणार नाही. परंतु, या प्रकरणात पोलिस यंत्रणेने प्रामाणिकपणे तपास करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com