Indapur Politic's : हर्षवर्धन पाटलांचा आणखी एक विक्रम; पती-पत्नी एकाच वेळी साखर कारखान्याचे अध्यक्ष, राज्याच्या राजकारणातील एकमेव उदाहरण

Bhagyashree Patil chairman Of Neera Bhima Sugar Factory : महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख घराण्यांमध्ये इंदापूर तालुक्यातील बावड्याच्या पाटलांचं नावं अग्रक्रमाने घेतले जाते. आमदारकीच्या प्रत्येक टर्ममध्ये मंत्रिपदी राहण्याचा मान बावड्याचे हर्षवर्धन पाटील यांना मिळालेला आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी एक विक्रम केला आहे.
Harshvardhan Patil-Bhagyashree Patil
Harshvardhan Patil-Bhagyashree Patil Sarkarnama
Published on
Updated on

Pune, 29 April : महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख घराण्यांमध्ये इंदापूर तालुक्यातील बावड्याच्या पाटलांचं नावं अग्रक्रमाने घेतले जाते. आमदारकीच्या प्रत्येक टर्ममध्ये मंत्रिपदी राहण्याचा मान बावड्याचे हर्षवर्धन पाटील यांना मिळालेला आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी एक विक्रम केला आहे. नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर हर्षवर्धन पाटील हे स्वतः कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. पाटील पती-पत्नी हे दोन कारखान्याचे अध्यक्ष बनले आहेत. महाराष्ट्रात एकच वेळी पती आणि पत्नी साखर कारखान्याचे अध्यक्ष होण्याचा अनोखा विक्रम बावड्याच्या पाटील दांपत्याने आपल्या नावावर नोंदविला आहे.

इंदापूर तालुक्यातील बावड्याच्या शहाजीनगर येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या नेतृत्वाखाली नीरा-भीमा कारखान्याची आतापर्यंत चालत आलेली बिनविरोधची परंपरा कायम राखली आहे. या कारखान्याच्या आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुका ह्या बिनविरोध झाल्या आहेत. त्यानुसार या वेळी सलग पाचव्यांदा कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यात माजी मंत्री पाटील हे यशस्वी ठरले आहेत.

नीरा भीमा साखर कारखान्याचे (Neera Bhima Sugar Factory) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षपदासाठी भाग्यश्री पाटील यांचा, तर दादासाहेब घोगरे यांचा उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला होता. सर्व संचालक मंडळाच्या संमतीने हर्षवर्धन पाटील यांची पत्नी भाग्यश्री पाटील यांची अध्यक्षपदी, तर दादासाहेब घोगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Harshvardhan Patil-Bhagyashree Patil
Karmala Politic's : पवारांच्या आमदाराकडे ओसाड गावची ‘पाटीलकी’; खरे आव्हान ‘आदिनाथ’चा बॉयलर पेटविण्याचे...

भाग्यश्री पाटील यांच्या नीरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षपदावरील निवडीमुळे पाटील कुटुंबीयांच्या नावाने आणखी एक विक्रम नोंदविला गेला आहे. कारण, हर्षवर्धन पाटील हे स्वतः इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. तसेच ते राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे आहेत. त्यामुळे पती-पत्नी एकाच वेळी साखर कारखान्याचे अध्यक्ष होण्याची विद्यमान परिस्थिती तरी एकमेव उदाहारण असावं. तसेच, राज्याच्या राजकारणातीलही बहुधा हे पहिलेच जोडपे असावे.

भाग्यश्री पाटील या नीरा भीमा कारखान्याच्या संचालिका म्हणून गेली वीस वर्षे काम करीत आहेत. तसेच, त्या अनेक सहकारी संस्थाच्या संचालिका आहेत. एका महिलेला अध्यक्षपदाचा मान नीरा भीमा साखर कारखान्याच्या इतिहासात प्रथमच भेटला आहे. मात्र, हर्षवर्धन पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयाची इंदापूरसह पुणे जिल्ह्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे.

Harshvardhan Patil-Bhagyashree Patil
Vidarbha Politic's : काँग्रेस आमदाराला फडणवीसांच्या कामाची भूरळ; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयाचे केले तोंडभरून काैतुक

हर्षवर्धन पाटील हे १९९५ पासून इंदापूरचे २००९ पर्यंत इंदापूचे आमदार होते. विशेष म्हणजे आमदारकीच्या प्रत्येक टर्ममध्ये पाटील हे मंत्री होते. मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळापासून पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळापर्यंत हर्षवर्धन पाटील हे प्रत्येक वेळी मंत्री राहिलेले आहेत. त्याबरोबरच पती-पत्नी एकाच वेळी साखर कारखान्याचे अध्यक्ष होण्याचा मानही पाटील दांपत्याने मिळविला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com