Harshvardhan Patil : मित्रपक्ष राष्ट्रवादीकडून धमक्या; घाबरलेल्या हर्षवर्धन पाटलांचे थेट शिंदे-फडणवीसांना पत्र

Latest Political News : इंदापुरातील राष्ट्रवादी आणि भाजप संघर्ष शिगेला पोहचला आहे. स्थानिक पातळीवर मित्र पक्षाचेच लोक चुकीची भाषा वापरत जाहीरपणे धमकावत असल्याचा आरोप भाजपाचे इंदापूरचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांनी केला आहे.
Harshvardhan Patil News
Harshvardhan Patil NewsSarakrnama
Published on
Updated on

Pune Political News : राज्यात सत्ताधारी असलेल्या एकनाथ शिंदे Eknath Shinde यांची शिवसेना Shivsena आणि भाजपला BJP पाठींबा देत उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले. शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजितदादांनी या पुढील काळात आम्ही तिघे एकत्र येऊन निवडणुका Loksabha Election लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

वरिष्ठ पातळीवर अजित पवार यांनी भाजप आणि शिंदे यांच्याशी जुळवून घेतले असल्याचे चित्र दिसत असले तरी स्थानिक पातळीवर मात्र अद्यापही भाजप राष्ट्रवादीमध्ये NCP दिलजमाई झाली नसल्याचे समोर आले आहे.

इंदापुरातील राष्ट्रवादी आणि भाजप संघर्ष शिगेला पोहचला आहे. स्थानिक पातळीवर मित्र पक्षाचेच लोक चुकीची भाषा वापरत जाहीरपणे धमकावत असल्याचा आरोप भाजपाचे इंदापूरचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील Harshwardhan Patil यांनी केला आहे.

मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या या धमकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांना पत्र लिहिले आहे.

आठ महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून महत्त्वाच्या नेत्यांना घेत बाहेर पडलेल्या अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्री पद मिळवले. तर त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना राज्यातील महत्त्वाच्या खात्यांची मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

राज्याच्या पातळीवर आता आम्ही भाजप शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर shivsena महायुतीत असून सर्व एक असल्याचा दावा या नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. यासाठी भाजप, राष्ट्रवादीच्या NCP वरिष्ठ नेत्यांकडून यापूर्वी देखील आपली भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Harshvardhan Patil News
Loksabha Election 2024 : अजितदादांना हव्यात लोकसभेच्या दहा ते बारा जागा!

वरिष्ठ पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस भाजप यांच्यात एक मत असल्याचे दिसत असले तरी स्थानिक पातळीवर मात्र या दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांमधील दुरावा अद्यापही कायम आहे. मतदार संघात होत असलेल्या महायुतीच्या विविध सभांमध्ये मित्र पक्षातील लोक जाहीर भाषणात धमकावत असल्याचे हर्षवर्धन पाटील Harshwardhan Patil यांनी सांगितले आहे.

जाहीर भाषणातून मित्रपक्ष म्हणून सत्तेत बरोबर काम करणारी पदाधिकारी अशा पद्धतीने मनमानी कारभार करून आम्हाला धमकावत असतील तर उद्या आम्ही मतदारसंघात फिरायचं का नाही? असा प्रश्न हर्षवर्धन पाटील यांनी विचारला आहे.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजप राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्ष आपापली भूमिका योग्य प्रमाणात पार पाडत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या Congress पदाधिकाऱ्यांकडून दिली जात असलेली धमकी ही मोठी खेदाची बाब आहे.

हे असेच सुरू राहिले तर उद्या जर काही झालं तर याला जबाबदार कोण असा प्रश्नही हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला आहे. दोन दिवसांपूर्वी इंदापूर येथे झालेल्या जाहीर सभेत हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता ठाकरे पाटील यांनी विधानसभेला शब्द देणारा असाल तरच लोकसभेचे काम करू असे स्पष्ट केले आहे. त्यानंतर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकाऱ्यांकडून हर्षवर्धन पाटील यांना दमबाजी केल्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

मित्र पक्षातील लोक असं जाहीर भाषणांमध्ये धमकावत असतील तर उद्या आम्ही मतदारसंघात फिरायचं की नाही? असा प्रश्न हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात विचारण्यात आला आहे. मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत असून यामध्ये आपण लक्ष घालावे आणि योग्य तो निर्णय घ्यावा, अशी विनंती देखील हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

Harshvardhan Patil News
Ajit Pawar : 'उमेदवार भेटला नाही की आम्ही कलाकाराला उभं करतो'; अजितदादांच्या टार्गेटवर पुन्हा अमोल कोल्हे ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com