Indapur Politics : हर्षवर्धन पाटलांच्या लेकीने वाढविले अजितदादांचे टेन्शन; ‘त्यांनी आमची तीनवेळा फसवणूक केलीय’

Ankita Patil-Thackeray Warning to Pawar : काहींना वाटत असेल की हर्षवर्धन पाटील यांना केंद्रीय पद मिळाले आहे. आम्हाला इथे सगळं मोकळं झालं. पण, तसं होणार नाही.
Ankita Patil-Thackeray : Rajvardhan Patil-
Ankita Patil-Thackeray : Rajvardhan Patil-Sarkarnama
Published on
Updated on

Indapur News : भारतीय जनता पक्षात असूनही इंदापूर तालुक्यातील राजकारणाला साजेशी भूमिका घेत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या लेकाने आणि लेकीने उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या विरोधात दंड थोपटण्याची भाषा केली आहे. आघाडीत असताना आमची तीनही वेळा शब्द देऊन फसवणूक केलेली आहे, त्यामुळे विधानसभेला जे आमचे काम करतील, त्यांनाच आम्ही लोकसभेत मदत करू, असे सांगून इंदापुरातून निवडणूक लढविण्याचे थेट संकेत अंकिता पाटील-ठाकरे आणि राजवर्धन पाटील यांनी दिला. (Indapur Political News)

दरम्यान, महायुतीमध्ये बारामती मतदारसंघात येणाऱ्या इंदापुरातून अजित पवार गटाच्या उमेदवाराला राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील गटाची मदत मिळणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. कारण, मागील दोन निवडणुकीत अजित पवार यांचे निकटवर्तीय दत्तात्रय भरणे यांनी पाटील यांचा पराभव केला आहे. आमदार भरणे हे सध्या अजित पवार यांच्यासोबत आहेत. विद्यमान आमदार असल्याने त्यांना तिकिटाची खात्री आहे. मात्र, आता हर्षवर्धन पाटील गटानेही विधानसभा लढण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे महायुतीचे नेते विशेषतः भाजपचे केंद्रीय नेतृत्व हर्षवर्धन पाटील यांची कशी समजूत घालणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. (Harshvardhan Patil Group)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ankita Patil-Thackeray : Rajvardhan Patil-
Shirur Loksabha : शिवसेनेने शिरूरवरचा दावा सोडला?; आढळरावांची म्हाडावर बोळवण...

बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे पाटील यांच्या मुलांनी घेतलेली भूमिका महत्वपूर्ण ठरते. भाजपला एक एक जागा महत्वाचा असताना पाटील हे अजित पवार यांच्या उमेदवाराला मदत करणार, हा खरा प्रश्न आहे. (BJP Vs NCP)

इंदापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील-ठाकरे म्हणाल्या, यापूर्वी आम्ही महाआघाडीत होतो. आता महायुतीत आहोत. आघाडीत असताना तीन वेळाला त्यांनी (पवार) शब्द देऊन फिरवला आहे. आमची त्यांनी फसवणूक केली असून त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. विधानसभेला जे आमचे काम करतील, त्यांचेच लोकसभेला आम्ही काम करणार आहोत.

Ankita Patil-Thackeray : Rajvardhan Patil-
Mangalvedha Politics : अभिजित पाटील लागले कामाला; भालके-आवताडेंच्या कार्यकर्त्यांना लावले गळाला...

काहींना वाटत असेल की हर्षवर्धन पाटील यांना केंद्रीय पद मिळाले आहे. आम्हाला इथे सगळं मोकळं झालं. पण, तसं होणार नाही. आम्ही 2024 ची विधानसभा लढणारच आहोत, असा इशारा भाजप कोअर कमिटीचे तालुकाप्रमुख राजवर्धन पाटील यांनी दिला.

राजवर्धन पाटील म्हणाले, ते आम्हाला ते 2009 पासून फक्त शब्द देत आले आहेत. दिलेल्या शब्दाला प्रत्यक्ष कृतीची जोड हवी, आताच त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी. लोकसभेची उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला मिळाली, तर आम्ही कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत. त्यांनी यापूर्वी अनेकदा शब्द देऊन फिरवले आहेत. या वेळी आम्ही फसणार नाही.

Edited by : Vijay Dudhale

Ankita Patil-Thackeray : Rajvardhan Patil-
Indapur Politics : शरद पवारांनी डाव टाकला; इंदापुरात जुन्या सहकाऱ्याला पुन्हा सोबत घेतले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com