Shirur Loksabha : शिवसेनेने शिरूरवरचा दावा सोडला?; आढळरावांची म्हाडावर बोळवण...

Mahayuti News : आढळराव यांच्या नियुक्तीमुळे शिरूर मतदारसंघ अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Mahayuti News
Mahayuti NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : शिरूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे शिरूर मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Loksabha Election-2024)

शिवसेनेकडून 15 वर्षे खासदार म्हणून प्रतिनिधित्व करणारे शिवाजीराव आढळराव पाटील हे आगामी लोकसभेसाठी शिरूरमधून इच्छुक आहेत. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला. दीड ते पावणेदोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्याने राज्यात सत्तापरिवर्तन झाले. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. (Shivsena-NCP News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahayuti News
Mangalvedha Politics : अभिजित पाटील लागले कामाला; भालके-आवताडेंच्या कार्यकर्त्यांना लावले गळाला...

शिवसेनेत झालेल्या बंडानंतर अनेकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री झालेल्या शिंदे यांना साथ देणे पसंद केले. यामध्ये आढळराव पाटील हेदेखील होते. मुख्यमंत्री शिंदे आणि भाजप यांच्या मदतीने येणाऱ्या लोकसभेत संधी मिळेल, या विश्वासाने आढळराव पाटील यांनी शिंदे यांच्या गटात जाणे स्वीकारले. त्यानंतर मतदार संघात ते चांगलेच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. (shivajirao Adhalrao Patil)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आठ महिन्यांपूर्वी पडलेल्या फुटीमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले. शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार गटातच राहिले. शिरूरचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना येणाऱ्या निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणारच, असे आव्हानच अजित पवार यांनी दिले. शिरूर लोकसभा मतदारसंघात फिरण्यासही अजितदादांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून नक्की कोण उमेदवार डॉ. कोल्हे यांच्या विरोधात उभा राहणार याबाबत उत्सुकता आहे.

Mahayuti News
Indapur Politics : शरद पवारांनी डाव टाकला; इंदापुरात जुन्या सहकाऱ्याला पुन्हा सोबत घेतले...

शिरूरमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवार देण्याचे ठरवल्यास आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागेल. मात्र, या मतदारसंघातून अजित पवार दुसराच उमेदवार देण्यास इच्छुक असल्यास आढळराव पाटील हे नाराज होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर आढळराव पाटील यांना खूष करण्यासाठी त्यांची पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) पुणे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून ही नियुक्ती करण्यात आली आहे. आढळराव यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असणार आहे. ही नियुक्ती म्हणजे आढळराव पाटील यांचे पुनर्वसन मानण्यात येत आहे. त्यामुळे शिरूर मतदारसंघ महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेकडे न राहता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपकडे जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

R

Mahayuti News
Baramati Loksabha : सुनेत्रा पवारांच्या संभाव्य उमेदवारीबाबत शरद पवार म्हणाले, ‘त्याबाबत तक्रार नाही...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com