Congress in Action Mode : सपकाळांच्या 'एन्ट्री'नंतर मरगळलेली काँग्रेस 'अ‍ॅक्शन मोड'वर; पहिलं मिशनही ठरलं? पुण्याबाबत मोठा निर्णय

Pune Congress News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यातच हर्षवर्धन सपकाळांच्या प्रदेशाध्यक्षपदी एन्ट्री झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीनंतर मरगळलेली काँग्रेस आता अॅक्शन मोडमध्ये आली आहे. पुणे काँग्रेसच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे.
Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkal Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभेतल्या यशानंतर विधानसभेला सपाटून मार खाललेल्या महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या तीनही पक्षांची तीन दिशेला तीन तोंडं अशी अवस्था आहे. तीन पक्षाला मोठी गळती लागली असून महायुतीकडे नेत्यांचा ओघ वाढला आहे. अशातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यातच हर्षवर्धन सपकाळांच्या प्रदेशाध्यक्षपदी एन्ट्री झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीनंतर मरगळलेली काँग्रेस आता अॅक्शन मोडमध्ये आली आहे. पुणे काँग्रेसच्या (Congress) गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे.

पुणे महापालिका (PMC) निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आता महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता काँग्रेसनेही शहरातील आठ विधानसभा मतदारसंघामध्ये कामाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी विधानसभा निहाय निरीक्षक व सहाय्यक निरीक्षक नियुक्त केले आहेत.

त्यानुसार वडगांवशेरी विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून बाळासाहेब शिवरकर यांची नियुक्ती करण्यात आली असून सहाय्यक निरीक्षक हे संतोष आरडे असणार आहेत. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अविनाश बागवे हे निरीक्षक तर राजेंद्र भुतडा सहाय्यक निरीक्षक असतील.

Harshwardhan Sapkal
PM Narendra Modi : PM नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत प्रथमच येणार एका व्यासपीठावर!

त्याचप्रमाणे कोथरूडमध्ये सुनिल शिंदे निरीक्षक तर संदीप मोकाटे सहाय्यक निरीक्षक, पर्वती मतदारसंघात संजय बालगुडे निरीक्षक तर सतीश पवार सहायक निरीक्षक पुणे कॅन्टॉन्मेंट मध्ये दिप्ती चवधरी निरीक्षक तर मेहबुब नदाफ सहायक निरीक्षक कसबा विधानसभा मतदारसंघात अ‍ॅड. अभय छाजेड निरीक्षक तर अजित दरेकर सहाय्यक निरीक्षक, हडपसर सुजित यादव निरीक्षक तर देवीदास लोणकर सहाय्यक निरीक्षक असणार आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपकडून आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पक्षसंघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सदस्य नोंदणी अभियान हातात घेण्यात आला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवून पक्षाची ताकद अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

Harshwardhan Sapkal
Shaktipeeth Expressway : 'फितुरीचा फटका शिवाजी, संभाजी महाराजांना'; सतेज पाटलांनी आता शक्तीपीठ विरोधात शेतकऱ्यांच्या काळजालाच हात घातला

उद्धव ठाकरेंची शिवसेनाही महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागली असून इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता काँग्रेसने देखील आगामी महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली असून महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नियुक्त्या करण्यास सुरुवात केली आहे.

महापालिका निवडणुका या महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून लढल्या जाणार की प्रमुख राजकीय पक्ष एकला चलो ची भूमिका घेणार याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे वेळ पडल्यास स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी असावी या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी आता मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.

Harshwardhan Sapkal
Sanjay Ghatge joins BJP : महिनाभरात जिल्ह्यात महाविकास आघाडीला खिंडार, भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा

काँग्रेसकडून करण्यात आलेल्या विधानसभानिहाय निरीक्षक व सहाय्यक निरीक्षकांना आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्या त्या मतदारसंघात प्रत्यक्ष जाऊन बैठका, मेळाव्यांचे आयोजन करावे लागणार आहे. तसेच पक्षसंघटनेबाबतचा सद्यपरिस्थितीचा अहवाल शहर काँग्रेस कमिटीस सादर करावा, असे आदेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून देण्यात आले आहेत, अशी माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर यांनी या पत्रकाद्वारे दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com