Mahadev Jankar News: शिंदे, ठाकरे, पवारांना मदत करा पण भाजप-काँग्रेसला नको; जानकर असं का म्हणाले?

RSP Office in Delhi : दिल्लीत रासपचे भवन उभारण्यासाठी मदत जमा करण्याचे काम सुरू
Mahadeo Jankar
Mahadeo JankarSarkarnama

Mahadev Jankar at Baramati : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांचा वाढदिवस ठिकठिकाणी साजरा केला जात आहेत. बारामती येथे त्यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी जानकरांनी उपस्थित शेतकऱ्यांना एक सल्ला दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Mahadeo Jankar
Maharashtra Political Crisis : शिंदे-फडणवीस सरकार कार्यकाळ पूर्ण करणार; शिंदे गटाच्या नेत्याचा दावा !

जानकर म्हणाले की, "शेतकऱ्यांनी एकवेळ शिंदे यांच्या शिवसेनेला, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला, वाटल्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला, जमलं तर माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाला मदत करावी. मात्र काँग्रेस (Congress) आणि भाजपसारख्या मोठ्या पक्षांना जवळ करून नये." जानकरांनी बारामती (Baramati) येथे असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळातून चर्चांना उधाण आले आहे.

Mahadeo Jankar
Uddhav Thackeray : ...म्हणूनच उद्धव ठाकरे आज सत्तेबाहेर; आशिष जयस्वालांनी सगळंच सांगितलं

दरम्यान, जानकरांनी भाजप व काँग्रेसला मदत का करायची नाही, याचे कारणही स्पष्ट केलेले आहे. जानकर (Mahadev Jankar) म्हणाले, "भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष राष्ट्रीय आहेत. ते देशातील मोठे पक्ष आहेत. त्यांचे राजकारण दिल्लीतून चालते. हे मोठे पक्ष आपल्याला विळखा टाकून संपविण्याचे काम करतात. डबल इंजिनच्या नावाखाली स्वतःचा फायदा करून घेतात. त्यामुळे BJP भाजप-काँग्रेस हे पक्ष आपल्या हिताचे नाहीत."

Mahadeo Jankar
Maan News : पंतप्रधान होण्याचे ध्येय; रासपचे दिल्लीत कार्यालय उभारणार : महादेव जानकर

राष्ट्रीय समाज पक्षाचे (RSP) दिल्लीत कार्यालय उभारण्यात येणार आहे. यासाठी जागा व इमारत असे चार कोटी रुपयांची गरज आहे. त्यासाठी मदत जमा करण्याचे काम सुरू आहे. या कार्यास राज्यभरातून उत्सफूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आमदार जानकर यांनी माण येथे दिली होती.

दरम्यान, जाधववाडी (ता.माण) येथे रासपचे जिल्हाध्यक्ष मामुशेठ विरकर यांनी आपल्या विरकर कुटुंबियांच्या वतीने आमदार जानकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दिल्लीत उभारल्या जाणाऱ्या कार्यालय व भवनासाठी ५५ हजारांची रोख मदत दिली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com