Sharad Pawar-Chhagan Bhujbal : शरद पवार-भुजबळ भेटीवर अजित पवार गटाची पहिली प्रतिक्रिया; ‘भुजबळांना तरी परवानगीची गरज नाही...’

NCP Politics : शरद पवार हे आमचे दैवत आहेत, हे आम्ही सातत्याने सांगतो आणि मानतोही
Umesh Patil-Sharad Pawar-Chhagan Bhujbal
Umesh Patil-Sharad Pawar-Chhagan Bhujbal Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 14 July : शरद पवार हे देशातील प्रमुख नेत्यांपैकी एक असून छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे शरद पवार यांना भेटायला जायला किमान छगन भुजबळ यांना तरी विचारून (परवानगी) जाण्याची गरज नाही. राज्यातील विविध पक्षांची नेतेमंडळी शरद पवारांना भेटत असतात, तशीच ही भेट आहे. त्यामुळे शरद पवार यांना भेटायला छगन भुजबळ हे ‘सिल्व्हर ओक’वर गेले, त्यातून काही वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असा खुलासा भुजबळ-पवार भेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला आहे.

उमेश पाटील (Umesh Patil) म्हणाले, अजित पवार (Ajit Pawar), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील या सर्व वरिष्ठ नेतेमंडळींनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाच्या अंतिम वेळेपर्यंत शरद पवार (Saharad Pawar) यांच्यासोबत सल्लामसलत झालेली होती.

शरद पवार यांना फसवून, त्यांच्या विरोधात जाऊन, त्यांना न विचारता किंवा त्यांचा विश्वासघात करून असा कुठलाही निर्णय भाजपसोबत गेलेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी घेतलेला नाही. या सर्व निर्णयाची नेतेमंडळींनी शरद पवार यांना पूर्वकल्पना दिली होती, त्यामुळे पवार यांच्याबद्दल आमच्या नेत्यांच्या मनात कुठलीही कटुता यापूर्वीही नव्हती आणि आताही नाही, असेही राष्ट्रवादीचे प्रवक्ते पाटील यांनी स्पष्ट केले.

शरद पवार हे आमचे दैवत आहेत, हे आम्ही सातत्याने सांगतो आणि मानतोही, त्यामुळे शरद पवार यांना भेटायला छगन भुजबळ हे ‘सिल्व्हर ओक’वर गेले यातून काही वेगळा संदर्भ घेण्याची आवश्यकता नाही. शेवटी आम्ही महायुतीमध्ये आहोत, तर ते महाविकास आघाडीमध्ये आहेत.

Umesh Patil-Sharad Pawar-Chhagan Bhujbal
Manoj Jarange Solapur Tour : मनोज जरांगे पाटलांच्या सभांचे वादळ आता पश्चिम महाराष्ट्रात घोंगावणार; सोलापुरात होणार सुरुवात

आमच्या भूमिका वेगवेगळ्या असून आम्ही सरकारमध्ये असून ते विरोधात आहेत. विरोध पक्षाच्या नात्याने ते आमच्यावर दररोज टीका करत असतात, आम्ही त्यांच्यावर टीका करतो. ही टीका वैयक्तीक नसते, तर भूमिका आणि वेगवेगळ्या मुद्यांच्या संदर्भातील टीका आहेत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

उमेश पाटील म्हणाले, राजकीय जीवनात आपण वेगवेगळ्या स्तरावर असतो, त्यावेळी लोकांना आपली भूमिका पटवून देताना एकमेकांवर टीका होतच असते. त्याचा अर्थ एकमेकांना भेटू नये, असा होत नाही. शरद पवार यांना भेटायला अडचण असण्याचे कोणतेही कारण नाही. तसेच, या भेटीतून वेगळा अर्थ काढण्याचेही कारण नाही.

Umesh Patil-Sharad Pawar-Chhagan Bhujbal
Ramesh Bais : रमेश बैस यांची मुदत संपणार, मोदी सरकार राज्यपालपदी कोणाची वर्णी लावणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com