राज्यातले बंड यशस्वी झाले तर शिवसेनेचे किमान १० खासदार शिंदेंसोबत जाणार

राज्यात महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aaghadi) सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या अडीच वर्षात शिवसेनेच्या खासदारांमध्ये अस्वस्थता आहे.
Uddhav Thackeray-Eknath Shinde
Uddhav Thackeray-Eknath ShindeSarkarnama

पुणे : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे बंड यशस्वी झाले तर शिवसेनेतील खासदारांचा (Member of Parliament) एक मोठा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार आहे. खासदारांचा हा आकडा किमान १० ते १२ जणांचा असेल, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

Uddhav Thackeray-Eknath Shinde
विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं करतील!

शिवसेनेच्या विद्यमान पंचावन्न आमदारांपैकी तब्बल ३९ आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. शिवसेनेकडे आता केवळ सोळा आमदार असून यामध्ये विधान सभेत निवडून आलेल्या आमदारांपैकी केवळ अदित्य ठाकरे हे एकमेव मंत्री उरले आहेत. या सोळा आमदारांपैकी आणखी काहीजण येत्या काही दिवसात गुवाहाटीचा रस्ता धरण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Uddhav Thackeray-Eknath Shinde
ताडोबात काळ्या वाघाने दिली तेजस ठाकरेंना हुलकावणी 

शिवसेनेच्यादृष्टीने हा मोठा धक्का असून इतक्या घडामोडी घडल्यानंतर देखील उदय सामंत यांनी रविवारी गुवाहाटी गाठले. एकापाठोपाठ आमदार शिंदे यांच्या गटात जात असतानादेखील मुख्यमंत्री ठाकरे त्यांना रोखू शकत नाहीत याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मोठ्यासंख्येने आमदार जात असताना त्याचा शिवसेनेत कसलाच विचार होताना दिसत नाही.

Uddhav Thackeray-Eknath Shinde
बाळासाहेब ठाकरे लोकनेते, त्यांचे नाव घेण्याचा सर्वांना अधिकार ; संभाजीराजेंचे रोखठोक बोल

या साऱ्या पाश्‍र्वभूमीवर लाकेसभेत निवडून गेलेल्या १८ पैकी किमान १० ते १२ खासदार शिंदे यांच्या गटात गेले तर शिवसेनेला संघटना म्हणून तो आणखी मोठा धक्का असेल, असे सांगण्यात येत आहे. राज्यात जिल्हा परिषदा, महानपरालिका तसेच त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहे.त्यामुळे आमदारांपाठोपाठ खासदारांची तयारी सुरू असल्याने पक्ष संघटनेला धक्का बसणार आहे.

Uddhav Thackeray-Eknath Shinde
आषाढीची पूजा कोण करणार, ठाकरे की फडणवीस? न्यायालयाच्या आदेशानंतर वाढली अनिश्चितता

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या अडीच वर्षात शिवसेनेच्या सर्वच खासदारांमध्ये अस्वस्थता आहे. भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेशिवाय केवळ शिवसेनेच्या मतपेटीवर आपण निवडून येऊ का ? हे या खासदारांच्या अस्वस्थतेचं महत्त्वाचं कारण मानलं जात आहे.

Uddhav Thackeray-Eknath Shinde
सहनशक्ती संपली होती, म्हणून आम्ही हे पाऊल उचलले... शंभूराज देसाई

महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या सोबत महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणूक लढविण्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्वच नेते ही भूमिका मांडत आहेत. मात्र, शिवसेनेच्या विद्यमान खासदारांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला काँग्रेसवर विश्वास नाही.

बहुतांश खासदारांचा या दोन्ही पक्षांना विरोधच आहे. जी भूमिका घेऊन शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. तीच भूमिका या खासदारांची सुद्धा आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय आपण लोकसभेत निवडून येऊ शकणार नाही आणि दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीवरती विश्वास नाही, ही भावना असल्याने राज्य विधानसभेत सध्या घडत आहे तीच भावना शिवसेनेच्या खासदारांची आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com