By Election : पोटनिवडणुकीत 'यांचीच' कमी होती, आता तीही कसर भरून निघाली; मग काय चर्चा तर होणारच!

Campaign News : अंतिम टप्प्यातील प्रचारामुळे कसब्यात रंगत
Puneri Pati
Puneri PatiSarkarnama
Published on
Updated on

Pune news : कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीचे मतदान २६ फेब्रवारीला होत आहे. सध्या प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे आपला उमेदवार निवडून येण्यासाठी महाविकास आघाडी आणि युतीमधील दिग्गज नेतेही दोन्ही ठिकाणी कंबर कसताना दिसत आहेत. दरम्यान या ठिकाणी दोन्ही बाजूने जोरदार प्रचार केला जात आहे.

प्रचारासाठी युतीने ४० जणांना रिंगणात उतरविले आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), पंकजा मुंडे आदी बड्या नेत्यांचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीकडून खुद्द शरद पवार (Sharad Pawar), नाना पटोले (Nana Patole), अजित पवार (Ajit Pawar), धनंजय मुंडे यांची फौज प्रचार करीत आहेत. त्यांना नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Puneri Pati
Harshvardhan Jadhav News : पुन्हा माझ्या दारात येवू नका, हर्षवर्धन यांची आगपाखड..

दोन्ही बाजूने मोठ्या सभा, कोपरा बैठका, स्नेहमेळावे, रोड शो आयोजन केले जात आहे. तसेच सोशल मीडियाचाही वापर होताना दिसत आहे. दरम्यान पुण्यात मात्र एका गोष्टीची कमतरता जाणवत होती. त्याची कसरही आता भरून निघाली आहे.

Puneri Pati
Sharad Pawar On BJP: लोकशाहीत सत्ता येते-जाते; सत्तेचे गुण-दोष सांगत पवारांचा भाजपला टोला

पुणे म्हटले की पुणेरी पाट्या (Puneri Patya) आल्याच. या पुणेरी पाट्यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी सामाजिक संदेशांसह नागरिकांना चिमटेही घेतले या चिमट्यांमुळेच पुणेरी पाट्या राज्यात प्रसिद्ध आहेत. आता या पुणेरी पाट्या कसब्यात ठिकठिकाणी दिसू लागल्या आहेत. शाब्दिक कोट्या या पाट्यांच्या माध्यमातून उमेदवाराचा प्रचार करण्यात आला आहे. तसेच त्यावर 'हॅशटॅग'चाही वापर केला आहे.

Puneri Pati
Chinchwad By-Election : पिंपरी-चिंचवडमध्ये 'वंचित' फुटली : शहराध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल!

पुण्यात जर निवडणूक होत असेल तर पुणेरी पाट्यांचा उल्लेख येणारच होता. या पोटनिवडणुकीत मात्र त्यास उशीर झाला आहे. मात्र आता अवघ्या तीन दिवस आधी का होईना कसब्यात पुणेरी पाट्यांची 'एन्ट्री' झाली आहे. या पुणेरी पाट्या आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Puneri Pati
Uddhav Thackeray News: चिंचवड पोटनिवडणुकीत ठाकरेंची भूमिका दुटप्पी; बंडखोर कलाटेंवर कारवाई नाहीच, आघाडीही शांत!

"कोणी कितीही म्हटलं, तुमचं काम मार्गी लागतो पण सर्वांना माहितीये वेळेला फक्त रवीभाऊच धावतो! त्यामुळे आम्हाला कुठलीही अमिष दाखवू नयेत"

#यंदाकसब्यातधंगेकरच

"येथे सोने, चांदी, पैसे इ. सर्वकाही स्वीकारले जाईल. टीप - मत मात्र रवी धंगेकरांनाच दिले जाईल!" #यंदाकसब्यातधंगेकरच

असे मजकुराच्या पाट्या आता कसबा मतदारसंघात दिसून आले आहेत.

Puneri Pati
Sharad Pawar In Chinchwad: अडचणीत चिंचवडकरांनी मदत केली म्हणून पोटनिवडणुकीला आलो; पवारांनी सांगितला किस्सा

या पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यापासून अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्यानंतर दोन्ही बाजूने मोठ्या नेत्यांना धावपळ करून नाराजांची मनधरणी करावी लागली. आता प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. असे असताना पुणेरी पाट्यांच्या माध्यमातूनही प्रचार करण्यावर उमेदवारांनी भर दिल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com